आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा एसटीच्या प्रवाशांची वाहकांबराेबरची होणारी किरकिर कमी करण्यासाठी तिकिटाची रक्कम पाच तसेच दहा रुपये अशी सरसकट करण्यात आली आहे. यात पुढे जावुन तिकीट यंत्रही डिजिटल केले असून, अॅन्ड्राईड यंत्रही दाखल होणार आहे. मात्र, सध्या उपलब्ध असलेल्या यंत्रामुळे वाहकांची मोठी डोकेदुखी वाढली आहे. मध्येच यंत्र शिट्टी मरत आहे, तर बॅटरीही टिकत नसल्याने वाहकांची मोठी कोंडी होत आहे. परिणामी यंत्राच्या दुरुस्तीमुळे ३० ते ६० किमी अंतराच्या लोकल फेऱ्यांना विलंब होत आहे. जिल्ह्याला तब्बल ६३० नव्या यंत्राची गरज आहे. नागरिकांच्या प्रवासाची धमनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लालपरीने आता डिजिटल सेवेकडे वळण घेतले आहे. यात तिकीट यंत्राची भर पडली आहे. एसटीचा प्रवास करताना सुट्या पैशांसाठी वाहक व प्रवासी यांच्यात नेहमीच वाद होतात. ही समस्या सोडवण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने १ एप्रिलपासून अँड्रॉइड मशिन देण्याचे नियोजन केले होते. यापुर्वी वाहकांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले होते, असे काही झाले नाही. मात्र, उपलब्ध असलेल्या तिकीट यंत्रामुळे वाहकांची मोठी डोकेदुखी वाढली आहे. बॅटरी चार्ज होत नसल्याने गाड्यांना विलंब होत आहे. तर चालत्या बसमध्ये तिकीट यंत्रातून शिट्टीचा आवाज येत आहे. तर काही हँग होत असल्याने वेळो वेळी चालू बंद करावे लागत आहे. या प्रकारामुळे वाहक पुर्णपणे वैतागले असून, नव्या यंत्राची आहे.
धावत्या बसमध्येच यंत्राची चार्जिंग
चार्जिंग टिकत नसल्याने गाडीत यंत्र चार्जिंग करण्याचा फंडा वापरला जात आहे. यंत्र हे लाइटवरच चार्ज करण्यात यावेत, असे आदेश एसटीच्या अभियांत्रिकी विभागाकडून वाहकांना दिले आहेत. मात्र, वेळेची बचत करण्यासाठी असे जुगाड करावे लागत असल्याचे एका वाहकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.