आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी हवालदिल:तळणी मंडळात सततच्या पावसामुळे कपाशी, सोयाबीन पिकांचे नुकसान

तळणी24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंठा तालुक्यातील तळणी मंडळात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल आहेत. पंचनामे करून सरसकट मदत देण्याची मागणी या परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे. गेल्या एक महिन्यापासून सतत संपूर्ण तळणी मंडळात पावसाचा कहर चालू असल्याने खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मुग, बाजरी व भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. सोयाबीन व कपाशीची वाढ होत नसून मुळा सडत असल्याने पाने पिवळी पडत आहेत. यावर्षी तळणी मंडळात गेल्या वर्षीच्या आलेल्या अनुभवानुसार शेतकऱ्यांनी उडीद, मुगाची मोजकीच पेरणी केली.

तशीच परिस्थीती ही कपाशीचीही आहे सोयाबीनच्या पेरणी क्षेञात वाढ झाली असली तरी या वर्षीचा पेरणीला झालेला विलंब व सततच्या पावसाने होत असलेले नुकसान सोयाबीनच्या उत्पादनावर परिणाम होणार असल्याची भिती शेतकऱ्यांतून व्यक्त केली जात आहे. हीच परीस्थीती संपूर्ण मंठा तालुक्याची असून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे कानडी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. गेल्या वर्षी ज्या पध्दतीने परतीच्या पावसाने नुकसान आलेल्या पिकांचे केले होते ते यावेळेस उत्पादन होण्याच्या आतच होत सुरवावातील पेरणीला विलंब झाल्यानंतर पिक वाढण्यासाठी आवश्यक त्या प्रकारचे वातावरण तयार झाले नाही.

सततच्या पावसाने स्वच्छ सुर्यप्रकाश मिळाला नसल्याने महागामोलाच्या बियाण्याची वाढ खुंटली आहे. अशा परिस्थतीत शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची नितांत गरज असताना सुध्दा कृषी विभागाकडून माञ याकडे दुर्लक्ष होत आहे. दरम्यान, ऑगस्ट महिन्यातील सलग विस दिवस तळणी मंडळात पाऊस पडल्यानंतर त्याची नोंद ९१ मीमी असून अतिवृष्टीच्या निकषा प्रमाणे शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळणे गरजेचे आहे. सप्टेबर महिन्यात सुध्दा संततधार सुरू असल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना लवकर मदत मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष कैलास सरकटे यांनी तहसीलदाराकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. तर सोयाबीन व कापूस पिकांसाठी नुकसान होत असून हे दोनही वान शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेचे आधार असुन तेच गेले आहेत. शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट पंचनामे करुन मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी माधव पन्हाळकर यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...