आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिटवला वाद:प्रेमीयुगुल लग्न करून ठाण्यात; तालुका पोलिसांनी मिटवला वाद

जालना4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुका पोलिसांच्या मध्यस्थीने प्रेमीयुगुलामुळे दोन्ही नातेवाइकांमध्ये झालेला वाद मिटवण्यात आला आहे जालना तालुक्यातील धावेडी येथील एकाच गावातील प्रेमी युगुलाने लग्न केल्याने मुलगा व मुलीकडच्या दोन्ही नातेवाइकांमध्ये वाद वाढला होता. दरम्यान, प्रेमीयुगुल शनिवारी तालुका पोलिस ठाण्यात आले. ठाण्यातही दोन्हीकडच्या नातेवाइकांची गर्दी झाली होती.

यात पोलिसांनी दोन्ही बाजूच्या नातेवाइकांना समज दिली. या प्रकरणात मुलाने मुलीला सांभाळण्यास मी सक्षम आहे, मुलीनेही लेखी दिले. दोघेही लग्न वयाचे असल्याने पोलिसांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला. नातेवाइकांनीही त्यांचा स्वीकार केल्याचे लेखी दिल्यानंतर हा वाद मिटवल्याचे पोलिसांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...