आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणवेश वितरित:एम. जी. नाथानी विद्यालयात गरजूंना गणवेश वाटप

जालना10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना येथील श्री. एम. जी. नाथाणी सिंधी हिंदी विद्यालयाचे संस्थापकीय अध्यक्ष स्व. जिंदुमलजी नाथाणी यांच्या पुण्यतिथी निमित्त संस्थेच्या वतीने अभिवादन करुन विद्यालयातील गरीब व गरजु विद्यार्थ्यांना गणवेश वितरित करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन भास्कर आबा दानवे, सिंधी संत महंत बाबा जीवनदासजी उदासीन, देविदास देशमुख, जगदिशसेठ प्रिस्थानी यांची उपस्थिती हाेती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य प्रदिप देशमुख यांनी तर मनाेगत डाँ. राजकुमार सचदेव व देविदास देशमुख यांनी केले.

याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी डॉ. राजकुमार सचदेव, सुखदेव बजाज, गुरुमुख नाथाणी, लक्ष्मणदास नाथाणी, प्रताप गेही, महेश नाथाणी, गाैतमसेठ गेही, प्राचार्य प्रदिप देशमुख, मुख्याध्यापक संताेष भवर यांच्यासह विद्यार्थी, शिक्षकवृंद व उपस्थित हाेते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मसरुर खान यांनी तर आभार प्रदर्शन सुखदेव बजाज यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...