आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार प्रदान:मधुकर गायकवाड यांना राज्यस्तरीय शिक्षक कार्यगाैरव  पुरस्कार

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील श्री.एम.जी.नाथाणी सिंधी हिंदी विद्यालयातील जेष्ठ शिक्षक मधुकर गायकवाड यांना शंभर शिक्षक क्लब आॅफ जालनाच्यावतीने महात्मा फुले यांच्या स्मृति दिनानिमित्त देण्यात येणारा राज्यस्तरीय शिक्षक कार्यगाैरव पुरस्कार त्यांच्या शैक्षणिक , सामाजिक,पर्यावरण व अंधश्रद्धा निर्मुलन क्षेत्रातील करीत असलेल्या कार्याबद्दल नुकताच सपत्निक प्रदान करण्यात आला.

याप्रसंगी उपजिल्हाधिकारी अंजली धानाेरकर, जिल्हा शिक्षणाधिकारी मंगल धुपे, शिक्षण निरीक्षक डाॅ. सतिश सातव, उद्याेजक सुनिलभाई रायठठा, डायटचे प्राचार्य विजयकुमार शिंदे, आर. आर. जाेशी, राजेभाऊ मगर यांच्यासह शंभर शिक्षक क्लबचे पदाधिकारी उपस्थित हाेते. या पुरस्काराबद्दल गायकवाड यांचे प्राचार्य, शिक्षकवृंद व संस्थेचे पदाधिकारी आदींनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...