आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअखिल भारतीय अग्रवाल संमेलनाच्या पुढाकाराने अग्रोहाशक्तिपीठ येथून प्रारंभ झालेली कुलदेवी आद्य महालक्ष्मी जन आशीर्वाद यात्रेचे जालना शहरात मंठा चौफुली येथे रुपम परिवाराच्यातर्फे भव्य स्वागत करण्यात येऊन महाआरती करण्यात आली.
ही रथयात्रा शहरातील प्रमुख मार्गावरुन नेण्यात आली. ही यात्रा पूर्ण भारतभर फिरणार असून अग्रोहा शक्तीपीठामध्ये निर्माण होणाऱ्या कुलदेवी आघ महालक्ष्मी व अष्टलक्ष्मीच्य विश्वातील पहिला विशाल दिव्य लौकिक भव्य मंदिराचा प्रचार प्रसार करण्यासाठी आग्रहा शक्तिपीठातील कुलदेवी आघ लक्ष्मी मंदिराची देशातील अग्रवाल परिवारांना जोडण्यासाठी प्रचार प्रसार साठी रथयात्रेचे देशात सर्व ठिकाणी आयोजन करण्यात आले. अग्रवाल समाजातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचणे हा त्याचा उद्दिष्ट असून महाराजा अग्रसेन यांच्या मंदिराच्या पाठोपाठ अष्टलक्ष्मी मंदिराची निर्मिती भव्य होत असून त्यासाठी ही रथयात्रा आहे. जालना शहरात मुख्य यजमान रुपम परिवाराने स्वीकारले.
सायंकाळी अखिल भारतीयअग्रवाल संमेलन आग्रहा द्वारा संचलित अखंड ज्योती दर्शन महाआरती महाराजा अग्रसेन जी महालक्ष्मी जी खाटू श्यामजी राणी सतीजी सालासर बालाजी की भजन संध्या अतुल गिदोडिया, शिवकुमार अग्रवाल कोपरगाववाले, मनोज अग्रवाल, निधी अग्रवाल यांच्या आवाजात झाली. अग्रवाल समाज , अग्रवाल सेवा समिती, अग्रवाल युवा मंच, अग्रमीलन ग्रुप, अग्रयुथ क्लब,अग्र शक्ती बहुमंडल, अग्रवाल महिला मंडळ, अग्रवाल बहुमंडल, अग्रवाल युवती मंडळ, आगर माधवी महिला मंडळ, आग्रह युनिक महिला मंडळ, अखिल भारतीय अग्रवाल महिला संमेलन यांच्या वतीने अग्र कुलदेवी माता महालक्ष्मीची महाआरती करण्यात आली.
रथयात्रा यशस्वी होण्यासाठी मनीष तवरावाला, जितेंद्र अग्रवाल, पुरुषोत्तम जयपुरिया, रामजी अग्रवाल, संजय भरतीया, दिलीप अग्रवाल, राहुल तालुका, आकाश तालुका, अरुण मित्तल, मनीष अग्रवाल, सचिन जयपुरिया, जगदीश अग्रवाल, राजेश अग्रवाल, विनोद गिन्डोडिया, नरेश गुप्ता, डॉ. सतीश गोयल, आनंद अग्रवाल, हनुमान प्रसाद भारुका, रामेश्वर अग्रवाल, मनोज कामड यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.