आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुढाकार:बारवांच्या दस्तऐवजीकरणासाठी महाराष्ट्र बारव मोहिमेचा पुढाकार

अंबड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील १५० बारव आणि पुष्करणीची यादी तयार करण्यात आली असुन या बारवांचे मोजमाप, ड्राँईंग, ड्रोन शॉट, पाण्याची माहिती, बारव, पुष्कर्णीचे आर्किटेक्चर तसेच दस्तऐवजिकरण करण्यात येवून ड्रोन शॉट घेण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र बारव मोहीमेचे समन्वयक रोहन काळे यांनी दिली. यासाठी राज्यातील अनेक आर्किटेक्चर महाविद्यालयाची मदत होणार आहे.

महाराष्ट्र बारव मोहीमेच्या माध्यमातून रोहन काळे यांनी बारव संवर्धन रक्षणासाठी पुढाकार घेतला असुन मराठवाड्यातील बारवांसाठी लक्ष्मीकांत सोनवतकर, रामभाऊ लांडे, श्रीकांत उमरीकर, आकाश कराड, कुलकर्णी सह अन्य सहकारी प्रयत्न करीत आहेत. पुण्यातील एमआयटी कॉलेजच्या माध्यमातून आतापर्यंत ४ बारवांचे दस्तऐवजीकरण २०२२ मध्ये पुर्ण करण्यात आले आहे. त्यामध्ये कोंढवा बुद्रुक पुणे, जेजुरी व नाशिक आणि गिरनारे या चार बारवांचा समावेश आहे. महाराष्ट्र बारव मोहीमेच्या माध्यमातून प्राचीन आणि सांस्कृतिक जलस्त्रोत वारसा संवर्धनासाठी प्रयत्न सुरू असुन बारवांचे दस्तऐवज झाल्यानंतर त्याची नोंद सरकारी अभिलेखावर होणार असल्याचे सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...