आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार प्रदान:जैन संघटनेचे देशात सर्वाधिक अवॉर्ड मिळाले महाराष्ट्राला

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय जैन संघटनेच्या दोनदिवसीय राष्ट्रीय अधिवेशनात देशातून सर्वाधिक अवॉर्ड महाराष्ट्र राज्याला मिळाले असून जालन्यातील रहिवासी तथा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष हस्तिमल बंब यांना चार पुरस्कार प्रदान करण्यात आले.संस्थापक शांतिलाल मुथ्था, राष्ट्रीय अध्यक्ष राजेन्द्र लुंकड यांच्या नेतृत्वाखाली विविध राज्याचे महिला-पुरुष कार्यकर्ता उपस्थित होते.

मुलींचे सक्षमीकरण अभियानात महाराष्ट्रात २४७ शिबिरे घेऊन ११२२७ मुलींना सक्षम करण्यात आले. अल्पसंख्याक या नात्याने समाजातील विशेष करून गरीब विद्यार्थीसाठी ६३ शिबिरे घेऊन १४००५ गरजुंना लाभ देण्यात आले.

जलसंधारण नदी नाले तलाव खोलीकरण रुंदीकरण गाळ काढण्याचे काम पाणंद रस्ते महाराष्ट्राला पाणीदार करण्यात आले. कोरानाच्या संकट काळात केलेल्या मानवीय सेवेचे कार्य अनाथ मुलांचे पालन-पोषण, आरोग्य शिबीरे, वधु-वर सम्मेलन, विधवा पुर्नःविवाह, रक्तदान शिबीरे, नियमित राज्यस्तरीय संपर्क दौरे असे सामाजिक उपक्रमात महाराष्ट्र आघाडीवर राहिला आहे. त्यामुळे हे चार पुरस्कार हस्तीमल बंब यांना प्रदान करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...