आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूर्व परीक्षा:महाराष्ट्र लोकसेवा आयोग पूर्व परीक्षा सहा केंद्रांवर

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त सेवापूर्व परीक्षा ५ नोव्हेंबर २०२२ रोजी होत आहे. जालना शहरातील मत्स्योदरी शिक्षण संस्था, अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालय, नागेवाडी, शासकीय तंत्र निकेतन महाविद्यालय, नागेवाडी, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, औरंगाबाद रोड, जालना, अंकुशराव टोपे महाविद्यालय, मोती बागेजवळ, सरस्वती भुवन माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला, टाऊन हॉलजवळ, सीटीएमके गुजराथी हायस्कूल, मुथा बिल्डिंग जवळ या केंद्रावर सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत होणार आहे.

केंद्राच्या परिसरात अशांतता निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, या केंद्राच्या १०० मीटर परिसरात ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजेपासून ते दुपारी १ वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागु करण्यात आले आहेत. उक्त परीक्षा केंद्राजवळच्या १०० मीटरच्या परिसरातील सर्व सार्वजनिक टेलिफोन/एसटीड बुथ / फॅक्स/झेरॉक्स केंद्र व ध्वनीक्षेपके परीक्षेच्या कालावधीत बंद ठेवण्यात यावेत, असे अपर जिल्हादंडाधिकारी केशवे नेटके यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...