आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार:रामकिशनजी पारे यांना महाराष्ट्र राज्य कृषिरत्न पुरस्कार जाहीर

जालना6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अखिल भारतीय स्तरावरील किसान एकता संघाच्या वतीने दिला जाणारा राज्य कृषिरत्न पुरस्कार यंदा चंदनझिरा येथील शेतकरी रामकिसनजी जीवनरावजी पारे यांना जाहीर करण्यात आला आहे. पारे कुटुंबाचा पाच भावांचा मोठा परिवार असून, तब्बल ८० एकरचे बागायतदार शेतकरी म्हणून त्यांची ओळख आहे.

उत्कृष्टरीत्या शेतीचे नियोजन रामकिशन पारे करतात. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या निवड समितीत किसान एकता संघ राष्ट्रीय अध्यक्ष सोरण प्रधान, राष्ट्रीय महासचिव देवेंद्र प्रताप सोमवंशी, प्रदेश अध्यक्ष सुधीर इंगळे, प्रदेश प्रवक्ता विनोद पाडर, प्रदेश महासचिव अमोल परदेशी, प्रसिद्धिप्रमुख मयूर सिंह यांचा समावेश आहे. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे

बातम्या आणखी आहेत...