आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:शिपाई, नाईक, हवालदार अन् एएसआयच्या बदल्या; तीन ठाण्यांचा पर्याय राहणार, डिफॉल्टरवर पोलिस अधीक्षकांचे असणार विशेष लक्ष

जालना16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • १५ एप्रिलपर्यंत बदल्या होणाऱ्यांचे मागवले चॉइस बदल्यांचे फॉर्म, मनाप्रमाणे बदली मिळण्यासाठी अनेकांना लागली उत्सुकता

पोलिस दलातील विविध घटकांसह अन्य विभागांमध्ये पाच वर्षापेक्षा अधिक काळ नोकरी करणाऱ्या पोलिसांची तसेच विनंती अर्ज व ज्यांच्याबाबत तक्रारी आहेत, अशा पोलिसांच्या प्रशासनाकडून सातत्याने बदल्या केल्या जातात. दरवर्षी मे-जूनच्या दरम्यान, सर्वसाधारण बदली प्रक्रिया राबवली जाते. पोलीस शिपाई, नाईक, हवालदार, सहायक पोलिस उपनिरीक्षक यांच्या बदल्या होत आहेत. १५ एप्रिलपर्यंत तीन ‘चॉईस’ ठिकाणे ऑप्शन म्हणून राहणार आहेत. तर यात मात्र, जे ‘डिफॉल्टर’ आहेत, अशांवर मात्र, एसपी, एसपींचे विशेष ‘लक्ष’ राहणार आहे.

दरवर्षी मे-जूनच्या दरम्यान सर्वसाधारण बदली प्रक्रिया राबविली जाते. पोलिस शिपाई, नाईक, हवालदार आणि सहायक पोलिस उपनिरीक्षक या पदांवर कार्यरत पोलिसांना बदलीसाठी अर्ज करायला लावतात. पाच वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी झाल्यामुळे बदलीसाठी पात्र असलेले पोलिस तसेच, कालावधी पूर्ण झाला नाही तरीही बदलीसाठी विनंती करु इच्छित असलेल्या पोलिसांना अर्ज करण्याच्या पोलीस अधिक्षकांकडून सूचना देण्यात आल्या आहेत. पाच वर्ष एका ठिकाणी राहील्यानंतर आता शहरी भागात जावे की, ग्रामीण भागातील पोलीस ठाण्यांमध्ये जावे, असे अनेक पेच कर्मचाऱ्यांसमोर असतात. परंतू, जे कर्मचारी विविध गुन्हे उघड करण्यासाठी सक्षम असतात, ज्यांचे काम चांगले आहे, अशांना चांगल्या पथकांमध्येही पोलीस अधिक्षकांकडून नियुक्ती करण्याचेही काम एसपींकडून होत असते.

जिल्ह्यातील सदर बाजार, कदीम पोलीस ठाणे, चंदनझीरा पोलीस ठाणे, तालुका पोलीस ठाणे या ठाण्यांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांमध्ये चांगलेच कर्मचारी असायला पाहिजे, यानुसार या ठिकाणी तपास कामात चपळ असणाऱ्यांनाच वरिष्ठांकडून विशेष करुन संधी दिली जाते. या ठाण्यांच्या हद्दीत विशेष करुन गुन्हे घडतात. जिल्ह्यात सर्वात मोठ्या असलेल्या जालना शहराचा भाग यात मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे या ठिकाणी विशेष करुन गुन्हे घडत असतात. या ठाण्यांच्या पोलीस निरीक्षकपदी निवड करतांनाही पोलीस अधिक्षकांना चांगल्याच अधिकाऱ्यांना निवड करावी लागते. रुजू झाल्यानंतर होते बिट वाटप बदल्या झाल्यानंतर संबंधीत ठाण्यातून या रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना बीट दिल्या जातात. चांगले काम असेल तर त्या कर्मचारी संबधीत पोलीस ठाण्याच्या डीबी पथकातही समाविष्ट करुन घेतले जातात. आता कुणाला कुठे जागा मिळते, याची उत्सूकता लागली आहे. पोलीस अधिक्षक कशा बदल्या करतात, याबाबत प्रत्येकाशी वैयक्तीक बोलतात की, आलेल्या ऑप्शननुसार बदल्या करतात, हे येणाऱ्या काळातच दिसेल.

१४०० पर्यंत एसआय ते शिपाई
१४०० च्या जवळपास जालना पोलीस दलात एसआय ते शिपाई कार्यरत आहेत. काही कर्मचाऱ्यांकडून गुन्हेगारांशी संबंध ठेवणे, वाळू माफीयांशीही असलेले संबंध यामुळे काही जणांना मध्येच मुख्यालयाशी अटॅच केल्या जाते. तर काहींचे निलंबनही होत असते. गतवर्षी एस. चैतन्य यांच्या काळात अनेकांचे निलंबन होऊन हेड क्वाॅर्टरशीही काही जणांना अटॅच केले होते.

वर्षाला २५०-३०० बदल्यास असतात पात्र
प्रत्येक वर्षी मे-जून महिन्यात जालना पोलीस दलातून २५० ते ३०० पोलीसांच्या बदल्या होत असतात. बदल्या होतांना कर्मचाऱ्यांचे ‘स्व-ग्राम’ नसले पाहिजे. यासह बदलीसाठी तीन ऑप्शन दिलेले असतात. यात कर्मचारी स्थानिक गुन्हे शाखा, सायबर सेल, आर्थीक गुन्हे शाखा, पोलीस ठाणे असे विविध पर्याय भरुन चॉईस ऑप्शन भरले जातात. यानंतर तीनपैकी एका ठिकाणी या कर्मचाऱ्याची नेमणूक केल्या जाते. यानंतर त्या ठिकाणी हे कर्मचारी रुजू होऊन कामाला लागतात.

बातम्या आणखी आहेत...