आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रमाता महाराणी अहिल्यादेवी होळकर बहुजन व्याख्यानमालेत दुसऱ्या पुष्पात “महासती देवी अहिल्या” व “मालवाधिपती” या एकपात्री नाटकांतून होळकर घराण्यांचा जाज्वल्य इतिहास हुबेहूब साकारण्यात आला. राष्ट्रमाता महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित बहुजन व्याख्यानमालेत कै.गणेश मतकर लिखीत विपीन मतकर निर्मित “महासती देवी अहिल्या”व ‘मालवाधीपती” या नाटकांचे अहिल्या नाट्य मंडळ इंदूर यांनी सादरीकरण केले.
यावेळी उपशिक्षणाधिकारी बाळासाहेब. खरात, शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष विलास वायाळ, सचिव राजेंद्र देव्हडे, संचालक सुनील खेडेकर, अरूण जाधव, साजेद पठाण, सुनील बोरूडे, डॉ. अश्विनी मिसाळ, डॉ. संगीता राजे-देशमुख, व्याख्यान मालेचे अध्यक्ष बालासाहेब आबुज, सचिव संतोष धारे यांची उपस्थिती होती.अहिल्याबाई होळकर यांचे पती खंडेराव होळकर यांचा मृत्यू, सती जाण्यापासून पासून परावृत्त होणे, पुत्र मल्हारराव होळकर यांचा मृत्यू, राघोबादादास दिलेली तंबी, खंबीरपणे सांभाळलेला राज्यकारभार असे प्रसंग “महासती देवी अहिल्या”या नाटकात रुपाली रुद्रदुबे यांनी सादर केले.
मल्हारराव होळकर हे सामान्य मुलापासून ते सुभेदार होईपर्यंतचा इतिहास डॉ. पंकज उपाध्याय यांनी अभिनयातून “मालवाधिपती”या एकपात्री नाटकाद्वारे सजीव साकारला. दिग्दर्शन सुनील मतकर यांनी केले तर ध्वनी, पार्श्वसंगीत चिन्मय मतकर यांनी दिले. संपूर्ण खचाखच भरलेल्या सभागृहातील रसिक श्रोत्यांनी होळकर घराण्याचा इतिहास डोळ्यात साठविला. सूत्रसंचालन डॉ. बाबूराव श्रीरामे यांनी केले तर भाऊसाहेब आटोळे यांनी आभार मानले.
या वेळी होळकरशाहीचे अभ्यासक रामभाऊ लांडे, पंडितराव तडेगावकर, सूर्यभान दहेकर, शांतीलाल बनसोडे, श्रीकांत गायकवाड, तुकाराम कोल्हे, दिपक दहेकर, आप्पासाहेब म्हस्के, दीपक वाघ, बाबासाहेब शेरकर यांच्यासह शिवाजीराव शेंडगे विद्यालयाचे कर्मचारी, महिला,युवक व श्रोत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
नाटिकाद्वारे प्रबाेधन करण्याचा वेगळा प्रयत्न
व्याख्यान मालेच्या इतिहासात प्रथमच नाटिकांद्वारे महापुरुषांचा गौरवशाली इतिहास सादर करून प्रबोधनाचा वेगळा प्रयत्न केला. अशी भूमिका व्याख्यानमालेचे अध्यक्ष बालासाहेब आबुज यांनी विशद केली. व्याख्यानमालेस बहुजन समाजबांधवांनी मोठा प्रतिसाद दिला असून वर्षभर प्रबोधनाचे उपक्रम राबवले जातील, असे स्पष्ट केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.