आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूपीएससीच्या तयारी:महात्मा फुले समता परिषदेची मागणी

वडीगोद्रीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्ली येथे जाऊन प्रशिक्षण घेण्यासाठी महाज्योतीने जी विद्यार्थ्यांसाठी केवळ दहा हजार रूपये महिना ही स्टायपेंड लागू केली आहे. ती महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना दिल्लीला राहून प्रशिक्षण घेण्यासाठी अत्यंत अपुरी आहे. ती वाढवण्यात यावी, अशी मागणी समता परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाज्योती ही संस्था ओबीसी व्हिजेएनटी व एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा पुर्व प्रशिक्षणासाठी, तसेच विविध प्रकारची कौशल्य विकास प्रशिक्षणे देवुन, युवक व विद्यार्थ्यांना सक्षम बणविण्यासाठी स्थापन झालेली महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था आहे.या महाज्योती संस्थेच्या वतीने नवी दिल्ली येथे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा पुर्व मोफत प्रशिक्षणासाठी १५०० विद्यार्थ्यांची निवड झालेली आहेत. यामधे ३० टक्के विद्यार्थींनीचा सुध्दा समावेश आहे.

परंतु दिल्ली येथे जावून प्रशिक्षण घेण्यासाठी महाज्योतीने जी विद्यार्थ्यांसाठी केवळ दहा हजार रूपये महिना ही स्टायपेंड लागु केली आहे. ती महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना दिल्लीला राहून प्रशिक्षण घेण्यासाठी हा अत्यंत अपुरी आहे. त्यामुळे अनेक गरीब विद्यार्थी व विशेषता विद्यार्थीनी सुध्दा दिल्ली येथील मोफत प्रशिक्षणासाठी निवड होवून सुध्दा एवढ्या कमी स्टायपेंडमध्ये दिल्लीला जावे की नाही, या संभ्रमात आहे. एवढ्या कमी स्टायपेंडमधे दिल्लीला विद्यार्थी योग्य प्रकारे प्रशिक्षण पुर्ण करू शकत नाही.

पीएचडी प्रमाणे या अभ्यासक्रमातही मदत द्या
एकीकडे महाज्योती पीएचडी साठी अगदी त्यांच्याच जवळच्या कार्यक्षेत्रातील विद्यापीठ किंवा महाविद्यालयात संशोधन करणार्‍या विद्यार्थ्यांना दरमहा ३१ हजार रूपये प्रति महिना फेलोशिप सतत पाच वर्षे पर्यंत देत आहे.तर महाराष्ट्रापासुन हजारो किलोमिटर दुरवर दिल्लीमधे जावुन केवळ १० महिण्याचे प्रशिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना केवळ दहा हजार रूपये स्टायपेंड महाज्योतीने देणे,ही फार मोठी विसंगती वाटते. यामुळे या विद्यार्थ्यांनाही दिल्या जाणाऱ्या स्टायपेंड मध्ये वाढ व्हावी. अशी मागणी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...