आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महावितरण:विविध मागण्यांसाठी महावितरण वीज कंत्राटी कामगारांचा बेमुदत उपोषणाचा इशारा

तीर्थपुरीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जालना जिल्ह्यातील महावितरण कंपनीत दोन विभागात यंत्रचालक व लाईनमन असे सुमारे ३५० कंत्राटी कामगार मागील दहा ते बारा वर्षांपासून नियमित रिक्त पदांच्या जागेवर कंत्राटी पद्धतीने काम करत असून यांचे माहे एप्रिल २०२२ पासून वेतन मिळत नसल्या कारणाने संघटनेने अनेकदा अधिक्षक अभियंता जालना यांच्या कडे लेखी तक्रार देऊनही मागील ७ महिने कामगारांचे वेतन झाले नाही ही शोकांतिका असून महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या मुंबई औद्योगिक न्यायालयात चालू याचिकेतील कामगारांना पुढील आदेश येईपर्यंत कामावरुन कमी करू नये असे लेखी आदेश प्रशासनाला असताना व संघटनेने निदर्शनात आणून दिल्यानंतर सुद्धा अक्षम्य असे दुर्लक्ष केल्याने मा.न्यायालयाचा अवमान झाला.

त्यामुळे प्रकरणी याचिका दाखल करण्यात निर्णय केंद्रीय पातळीवर घेण्यात आला आहे. सात महिने वेतन न देता काम करून घेणे हे अमानवी व निसर्ग न्याया पासून कामगारांना वंचित ठेवल्यासारखे आहे. त्यामुळे सदर प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी, थकीत वेतन मिळावे, न्यायालय संरक्षित कामगारांना पुन्हा सेवेत घ्यावे या सर्व मागण्या मान्य होई पर्यंत बुधवार दिनांक ९ नोव्हेंबर २०२२ पासून जालना महावितरण अधीक्षक अभियंता कार्यालय, कन्हैयानगर येथे बेमुदत आमरण उपोषणसाठी संघटनेचे नूतन प्रदेश अध्यक्ष निलेश खरात यांच्यासह आदी कामगार सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अशोक खंडागळे यांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...