आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखासगीकरणाला विरोध म्हणून जिल्ह्यातील महावितरणचे कर्मचारी ४ जानेवारी रोजी ७२ तास संपावर जाणार आहेत. मंगळवारी रात्रीपासून संप सुरू होणार आहे.आदानी इलेक्ट्रिक कंपनीने महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे समांतर परवानासाठी अर्ज केलेला आहे. ही बाब म्हणजे महावितरणचे खासगीकरण होय. यामुळे मोठ्या प्रमाणात जाळे निर्माण करणाऱ्या महावितरणने कोट्यवधी रूपयांचा खर्च केलेला आहे.
याचा उपयोग करून खासगी कंपन्या कमाई करणार आहेत. तसेच ही बाब ग्राहक तसेच कर्मचाऱ्यांसाठी धोकादायक असून समांतर परवान्याला परवानगी देण्यात येऊ नये यासाठी राज्यभरासह जालन्यात महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंते संघर्ष समितीने ४ जानेवारी रोजीपासूनच्या २४ तासांच्या बंद मध्ये सहभागी होण्याचे नियोजन केले आहे. दरम्यान, या आंदोलनाची दखल न घेतल्यास पुढे १६ जानेवारी रोजी जिल्हास्तरावर द्वारसभा घेणे तर १८ जानेवारी रोजीपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेणार आहेत.
जालन्यात वर्कर्स फेडरेशनचे कॉ.आयाज खान पठाण, संतोष मिसाळ, अमर डांगे, संजय मगरे, सबर्डिनेट इंजिनिअर असोसिएशनचे आर.ए.नागरे, वीज तांत्रिक कामगार संघटनेचे आर. एन. शडमल्लू, आर. एन. गिरी, आप्पासाहेब दाभाडे, बहुजन विद्युत फोरमचे प्रकाश चव्हाण, भारतीय कामगार सेनेा, कामगार महासंघ, मागासवर्गीय संघटनेचे पदाधिकारी या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.