आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी त्रस्त:महावितरणने घेतला बिल वसुलीचा ऐन रब्बीच्या तोंडी ‘तुघलकी’ निर्णय

पिंपळगाव रेणुकाई10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई परिसरातील पेरणी केलेल्या रब्बी पिंकाना पाण्याची निंतात आवश्यकता आहे. नुकतेच पिके वाढवण्याची स्थिती आहे. ही संधी हेरुन महावितरणने शेतकऱ्यांनी तत्काळ विज बिल भरणा न केल्यास विद्युत पुरवठा २२ नोव्हेंबर मंगळवारी रोजी खंडीत करण्याचा थेट ईशारा दिला. यामुळे ऐन दुष्काळात महावितरणचा हा प्रकार पाहुन शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. विज पुरवठा खंडीत झाला तर रब्बी वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. शिवाय शेतकऱ्यांचे शासन म्हणून काही महिन्यांपूर्वी सत्तेत आलेल्या सरकारने हा जुल्मी कारभार थांबवावा, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.आधीच शेतकरी ओल्या दुष्काळामुळे परेशान झाले आहेत.

पिंपळगाव रेणुकाई परिसरात यावर्षी रब्बी हंगामात दुपटीने वाढ झाली आहे.यावर्षी सुरूवातीपासूनच पर्जन्यमान चांगले राहल्याने सर्वञ जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली.यामुळे विहिरीतील देखील पाणी पातळी वाढली.उपलब्ध पाण्याचे नियोजन करुन खरिपात नुकसान सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना रब्बीकडून काही तरी हाती लागेल म्हणून जवळजवळ आठ ते दहा हजार हेक्टरवर गहु, हरभरा, मका, ज्वारी, मोहरी, सुर्यफुल, बाजरी आदी पिकाची पेरणी केली आहे. सध्या पोषक वातावरणामुळे पिके देखील जोमात आहे. सर्वत्र पिंकाना पाणी देण्याची लगबग शेत शिवारात सुरू आहे. यात कृषी पंपाचा विद्युत पुरवठा देखील सतत खंडीत होत असल्याने शेतकऱ्यांना पिंकाना पाणी देंताना अनंत अडचणीचा सामना करावा लागत आहे. एक एकर शेती भिजविण्यासाठी तब्बल आठ दिवस लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे.

आता अशातच पिंपळगाव रेणुकाई येथील विद्युत उपकेंद्रातुन विज पुरवठा होणाऱ्या अकरा गावातील शेतकऱ्यांना विज बील भरा अन्यथा विद्युत पुरवठा खंडीत करु म्हणून महावितरणकडून ईशारा देण्यात आला आहे.यामुळे ऐन दुष्काळात सापडलेल्या शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले आहे. रब्बी हंगाम हातातोंडाशी आलेला आहे.त्यातच महावितरणकडून विज पुरवठा खंडीत करण्यात येणार असल्याने शेतकरी हवालदील झाले आहे. परतीच्या पावसात झालेल्या नुकसानीची मदत देखील शेतकऱ्यांच्या पदरी अद्याप पडलेली नाही. त्यात आता महावितरणकडून वसुलीच्या नावाखाली छळ सुरू झाल्याचे शेतकऱ्यांतून बोलले जात आहे.

जगावे तरी कसे
खरिपात परतीच्या पावसाने सर्वच धूवून निघाले. ईकडुन-तीकडून आता रब्बी पेरणी केली आहे.त्याला देखील महावितरणचे ग्रहण लागले आहे. ईतके शेतकऱ्यांचे खर्चाचे वांदे असताना हजारो रूपये विज वसुली कशी भरावी हा प्रश्न आहे. सर्वांनीच एकप्रकारे शेतकऱ्यांची थट्टा लावली आहे. आता जगावे कसे हा प्रश्न आहे.- रतन मिसाळ, शेतकरी, रेलगाव

शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरू
यंदा रब्बी समाधानकारक आहे.ऐन पिंकाना पाण्याची गरज असताना महावितरणकडून परिसरातील शेतकऱ्यांचा विज पुरवठा खंडीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. विविध संकटांनी होरपळलेल्या शेतकऱ्यांकडून सक्तीची विज वसुली, विज पुरवठा तोडु नये. - संग्रामराजे देशमुख, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस

वीज ग्राहकांनी सहकार्य करावे
पिंपळगाव रेणुकाई गावातील सुजाण वीज ग्राहकांना सूचित करण्यात येते की, आपले कृषीपंपाचे विद्युत रोहित्र दि. २२/११/२०२२ नंतर बंद करण्यात येणार आहे. तरी सर्व ग्राहकांनी वीज बिल भरणा करून महावितरण कार्यालयास सहकार्य करावे व वीज तोडणीची कटू कार्यवाही टाळावी, असे आवाहन सहाय्यक अभियंता प्रदीप गावंडे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...