आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरवणूक:माहेश्वरी महिला मंडळाकडून गणगौरनिमित्त गावात मिरवणूक, टेंभुर्णीतील माहेश्वरी महिला मंडळाचा उपक्रम

टेंभुर्णी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथे माहेश्वरी महिला व कुमारिकेच्या वतीने गणगौर निमित्त रविवारी (तीन) महादेव पार्वती च्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. प्रारंभी सर्व महिलांनी एकत्र जमून श्रीराम मंदिरामध्ये महादेव पार्वती च्या प्रतिमेचे पूजन केले तद्नंतर गावातील प्रमुख रस्त्यावरून प्रतिमेची फेरी काढण्यात आली नवीन वस्त्र परिधान करून पारंपरिक पद्धतीने माहेश्वरी पेहराव करून वाजत गाजत शिवपार्वती च्या प्रतिमेची मिरवणूक लक्षणीय ठरली. या वेळी माहेश्वरी समाजाच्या जेष्ठ महिला कांताबाई बांगड़ मंजु काबरा, ताराबाई सोमानी, किरण काबरा. मंजूश्री काबरा, शोभा काबरा, चंद्रकला काबरा, शिवकन्या सोमानी, संगीता अग्रवाल, मीरा काबरा , सरोजबाई काबरा, शंकुतला काबरा, सूरजबाई काबरा, अर्चना शर्मा, शारदा काबरा, सुनीता जांगिड, शोभा सोमानी, संगीता जांगिड, अनिता जांगिड,उजवला सोमाणी, सुरेखा काबरा, विना काबरा, सरला सोमानी, रुचिता सोमानी, जयश्री काबरा, अर्चना शर्मा, चांदनी जांगिड, कल्याणी काबरा, अनिता मिस्त्री, संगीता मिस्त्री, पूजा सोमानी, हर्ष अग्रवाल, मोनिका काबरा, स्वाती काबरा, तेजस्विनी जांगिड, खुशी सोमानी, राशी सोमानी, स्वस्ति काबरा, त्रिशा काबरा यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...