आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शांतता समितीची बैठक:गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवा; सपोनि अभिजित मोरे यांचे पिंपळगाव रेणुकाई येथे गणेश मंडळाला आवाहन

पिंपळगाव रेणुकाई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणेशोत्सवाच्या काळात कुठलाही अनुचित प्रकार होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची दक्षता गावातील प्रत्येक गणेश मंडळ आणि जागरूक नागरिकांनी घेण्याचे आवाहन पारध पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजीत मोरे यांनी केले. उत्सवाच्या काळात कुणीही गालबोट लावण्याचा प्रयत्न केला तर त्याची गय केली जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे गणेशोत्वसाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी पोलिस पाटील गणेश निकम, कडूबा देशमुख, गणेशराव देशमुख, संतोष बोर्डे, पंडीत नरवाडे, सुनील देशमुख, इरफान पठाण, लक्ष्मण आहेर, समाधान तायडे, अमोल नरवाडे, राधाकिसन भोसले, भिकनराव देशमुख, निवृत्ती गावंडे आदी उपस्थित होते. मोरे म्हणाले की, एक सामाजिक सलोखा जोपसणारे आणि जागरूक जनतेचे गाव म्हणून तालुक्यात पिंपळगाव रेणुकाईची ओळख आहे. मागील दोन वर्ष कोरोनामुळे मोठ्या प्रमाणावर गणेश भक्तांना गणेश उत्सव साजरा करता आला नाही. त्यामुळे यावर्षी तरुणाईमध्ये उत्साह आहे. हा उत्साह त्यांनी रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, बेटी बचाव बेटी पढाव आदी सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला पाहिजे. जेणेकरुन समाजात आणि इतर गावात देखील आगळावेगळा संदेश जाईल. बाप्पाच्या मिरवणूकीसाठी लेझीम, हलगी, ढोल पथक यासारख्या पारंपरिक वाद्यांचा वापर करावा. पोलिस प्रशासन हे जनताभिमुख आहे. समाजाच्या भल्यासाठी कायद्याची सांगड घालून पोलिस प्रशासनाला डोळ्यात तेल घालून रात्रंदिवस काम करावे लागते. त्यामुळे गणेशोत्सव काळात मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी पोलिस प्रशासनाच्या सूचनांचे व नियमांचे पालन काटेकोरपणे करावे, दरम्यान कुणी जर उत्सवाच्या काळात अनुचित प्रकार घडवून आणण्याचा प्रयत्न केला तर त्याला कडक शासन करण्यात येईल, असा इशारा मोरे यांनी दिला. कर्मचारी प्रकाश सिनकर, दिनेश पडोळ आदीची उपस्थिती होती.

सामाजिक कार्यक्रम
पिंपळगाव रेणुकाई येथे यावर्षी एकूण सात गणेश मंडळाची स्थापना होणार आहे. मागील दोन वर्ष कोरोनामुळे गणेश भक्तांच्या आनंदावर विरजण पडलेले होते. यंदा मात्र, सर्वत्र मोठ्या उत्साहात गणेश उत्सव साजरा केला जाणार आहे. त्या अनुषंगाने पिंपळगाव रेणुकाई येथे गणपती आगमनापासून ते विसर्जनापर्यंत गावात सामाजिक, धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल राहणार आहे. शिवाय कुठेही गालबोट लागणार नाही, याची खात्री गणेश मंडळांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...