आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टवाळखोरांकडून होतो त्रास:कायदा, सुव्यवस्था आबाधित ठेवणे‎ ही प्रत्येकाची जबाबदारी : तडवी‎

जाफराबाद‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामीण भागातुन शिक्षणासाठी येणाऱ्या‎ विद्यार्थींनीची संख्या जास्त असून‎ तालुक्यातील विविध भागातुन या‎ विद्यार्थीनींची संख्या मोठी आहे. या‎ विद्यार्थीनंीना कोणत्याही प्रकारचा ‎ टवाळखोरांकडून होत असल्यास पोलिसांना‎ कळवावा. तर सर्वांनीच कायदा व‎ सुव्यवस्था आबाधित ठेवण्यासाठी‎ पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन‎ पीएसआय विजय तडवी यांनी केले.‎

यावेळी तडवी म्हणाले की, अलीकडच्या‎ काळात शहरात काही टवाळखोर मुल‎ येऊन या मुलींच्या समोरुन सुसाट वेगाने‎ दुचाकी चालविणे, वेगवेगळे स्टंटबाजी‎ करणे, अश्लील हावभाव करणे, शिट्या‎ वाजविणे, शेरेबाजी करणे असे उपद्वाप या‎ उनाड मुलांनी सुरु केल्याच्या तक्रारी कानी‎ येत आहे. म्हणुन पोलिस अधिक्षक डाॅ.‎ अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व‎ सहायक पोलिस निरीक्षक राजाराम तडवी‎ यांच्या नेतृत्वाखाली पोलिस काका पोलिस‎ दिदी हे महीला व मुलींच्या सुरक्षितेसाठी‎ अभियान राबविण्यात येत असून कायदा व‎ सुव्यवस्था आबाधित ठेवण्यासाठी सर्वांचे‎ सहकार्य अपेक्षित त्यांनी सांगीतले.

यावेळी‎ संस्थेचे अध्यक्ष संजय गौतम, प्राचार्य मुकुंद‎ राऊत, मुख्याध्यापक संदिप पंडीत, पो. काँ.‎ एस. एन. जायभाये, जे. एस. निकम, एस.‎ आर. साळवे, महेश वैद्य, शाबान तडवी,‎ जी. एस. खेडेकर, शे. मुजिब, डी. डी.‎ लोखंडे, राजेंद्र अंभोरे, मनिषा पडघण,‎ सुनिता झिगे, रईसा खान, निलोफर सय्यद,‎ अरुण शेळके, सुधाकर गोफणे, आबा‎ सुतार, नितिन टेकाळे, रवि डोळे, विश्वनाथ‎ फोलाने, रामेश्वर सवडे, यांची प्रमुख‎ उपस्थिती होती.‎

बातम्या आणखी आहेत...