आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळीज चिरत जाणारा रुग्णवाहिकांचा आवाज!:सिंदखेडराजा येथे अपघातात ठार झालेल्या 13 कामगारांचे मृतदेह जालना जिल्हा रुग्णालयातून मध्य प्रदेशात रवाना

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शुक्रवारी समृद्धी महामार्गावर काम करणाऱ्या मजुरांना घेऊन जाणारे ट्रक तढेगाव फाट्याजवळ रस्त्याच्याकडेला उलटला होता

बुलडाणा जिल्ह्यातील दुसर बीडजवळील तढेगावमध्ये शुक्रवारी भीषण अपघात झाला. या अपघातात 13 लोक ठार झाले होते. सिंदखेडराजा- मेहकर महामार्गावरील तढेगाव फाट्यावर हा अपघात घडला होता. आज या मजुरांचे मृतदेह जालना जिल्हा रुग्णालयातून सकाळी मध्य प्रदेशकडे रवाना झाले. यावेळी काळीज चिरत जाणारा रुग्णवाहिकांचा आवाज ऐकून अनेकांच्या काळजात धस्स झालं.

शुक्रवारी समृद्धी महामार्गावर काम करणाऱ्या मजुरांना घेऊन जाणारे ट्रक तढेगाव फाट्याजवळ रस्त्याच्याकडेला उलटला होता. या दुर्घटनेत आतापर्यंत 13 लोक ठार झाले आहे. तर 3 लोक गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी दुपारी 12:30 वाजेच्या दरम्यान घडली. यानंतर गंभीर जखमींना जालना येथील रुग्णालयात हलवण्यात आले होते.

कसा घडला अपघात ?
सिंदखेडराजा- मेहकर महामार्गावर बसला साईड देत असतांना रस्त्याच्या बाजूला उभा केलेला ट्रक (क्र. एम.एच. 11 सीएच 3728) पावसामुळे रस्ता खचून कलंडला व अपघाताने रस्त्याच्या खाली पूर्णपणे उलटला. त्यामुळे टिप्परच्या मागच्या भागात लोखंडी बारवर बसलेले 16 जण त्याखाली दबले गेले. दरम्यान, या दुर्घटनेत 13 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती किनगाव राजा पोलिसांनी दिली. हे सर्व मजूर समृद्धी महामार्गाच्या कामासाठी मध्यप्रदेशातील खरगोन येथून आलेले होते. यामध्ये वाचलेल्या तिघांमध्ये एका पाचवर्षीय मुलीचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...