आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सुरळीत करा, नसता आंदोलन करणार

वाघ्रुळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना तालुक्यातील वाघ्रुळ सर्कलमधील बऱ्याच गावामधील शेतकऱ्याची वीज कनेक्शन बंद केल्यामुळे येथील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. महावितरण कंपनीच्या सावळ्या गोंधळामुळे शेतकरी मात्र संकटात सापडला आहे. वीजपुरवठा सुरळीत न केल्यास आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा अखिल भारतीय किसान काँग्रेस तालुका अध्यक्ष शिवाजी गायकवाड यांनी कार्यकारी अभियंता जालना यांच्याकडे निवेदनाव्दारे दिला आहे.

निवेदन देतेवेळी शिवाजी गायकवाड,भारत खरात, राम चव्हाण, रतन शिंदे,कृष्णा चौहान आदींची उपस्थिती होती. तालुक्यात वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वाघ्रुळ परिसरात द्राक्ष, मोसंबी, डाळिंब बागायतदार शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना कुठलेही नोटीस न देता विद्युत पुरवठा खंडित केला आहे लवकरात लवकर वीज कनेक्शन जोडावे अन्यथा तालुक्यातील सर्व शेतकरी आंदोलन करणार असल्याचेही निवेदनात नमुद करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...