आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरपाई देण्याची मागणी:खरीप पीक नुकसानीचे पंचनामे करा; ​​​​​​​वाटूर परिसरातील शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन

वाटूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संततधार पावसामुळे परतूर आणि मंठा तालुक्यातील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संततधार पावसामुळे वाटूर शिवारात सोयाबीन, कापूस, मूग, उडीद पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, पावसाळा सुरू झाल्यापासून तर आजपर्यंत संततधार वाटूर मंडळ सुरु आहे.

दुबार पेरणी करूनही नुकसान झाले आहे. अगोदरच शेतकरी कर्जबाजारी असताना मोठ्या आशेने केलेल्या खरिपाची तयारी पाण्यात गेल्याने निराशा झाली आहे. खरीप हंगाम हा शेतकऱ्यांच्या आर्थिक दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा असतो. या हंगामावरच वर्षभराचे अर्थकारण असते. परंतु शेतकऱ्यांवर संकटाची मालिकाच सुरु आहे.शासनाने याची गंभीर दखल घेऊन शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...