आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन:वंचितांना आत्मनिर्भर करणे हेच महामानवांचे खरे स्मरण ; अर्जुन खोतकरांचे प्रतिपादन

जालना8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

समाजातील उपेक्षित, वंचित घटकांना पायावर उभे राहण्यासाठी सहाय्य करणे या साठी महामानवांनी आयुष्य वेचले असून वंचितांना आत्मनिर्भर करणे हेच महामानवांचे खरे स्मरण आहे. असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले. साहित्य रत्न आण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथी निमित्त स्वा.सै. रामभाऊजी राऊत नागरी सहकारी पतसंस्थेत अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला पतसंस्थेचे अध्यक्ष राजेश राऊत, पंडित भुतेकर, सुधाकर निकाळजे, गणेश राऊत, प्रा. राजेंद्र भोसले, संजय देठे, शामसुंदर लोया यांची उपस्थिती होती. राजेश राऊत यांनी राष्ट्र बळकटीकरणासाठी छोटे समूह सशक्त होणे गरजेचे असल्याने याच विचाराने संस्था कार्यरत असल्याचे सांगितले. यावेळी गणेश भोसले, रूपेश जैस्वाल, शांतीलाल राऊत, सागर देवकर, सुरेश गुलगे, नरेश जैस्वाल, ज्ञानदेव सोळुंके, निळकंठ कुलकर्णी, जितेंद्र डुरे, सुशील पारिख, रोहन राऊत, गणेश आगलावे, विशाल नंदाल यांंच्यासह आदींची उपस्थिती होती. यावेळी पतसंस्थेच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...