आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरवठा योजना पुर्ण:माळशेंद्राचे सरपंच शिवाजी जाधव,उपसरपंच लहाने यांचा सत्कार

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यतील माळशेंद्रा येथील ग्रामपंचायतीचे नुतन सरपंच शिवाजी काशिनाथ जाधव व उपसरपंच विजय नामदेव लहाने यांचा जालना पंचायत समिती कार्यालयात सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देतांना उपसरपंच विजय लहाने म्हणाले की, माळशेंद्रा गावाच्या विकासात कोणतेही राजकारण न आणता सर्वांना सोबत घेवून चालणार आहे. तसेच मागील काळातील घाणेवाडी ते माळशेंद्रा १४ किलो मीटर ची अर्धवट पाणीपुरवठा योजना ही पुर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करून, गावाचा पाणीप्रश्‍न कायमचा सोडविणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले.

१ नोव्हेंबर रोजी जालना येथील नवीन पंचायत समिती इमारतीच्या सभागृहात आयोजित सत्कार सोहळ्याप्रसंगी जालना ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष आर. यु. गोरे, सरचिटणीस पी. एस. वाघ, जालना कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष श्रीनिवास घुगे, आरोग्य अधिकारी भुतेकर, विस्तार अधिकारी आर्वेश सुर्यवंशी, जालना ग्रामसेवक पतसंस्थेचे व्हा.चेअरमन अण्णासाहेब शिंदे, आर.एस. घोळवे, जालना ग्रामसेवक पतसंस्थेचे माजी अध्यक्ष आर.डी. देशमुख, जालना कर्मचारी महासंघाच्या उपाध्यक्षा अ‍ॅड. अलका धांडे, जालना ग्रामसेवक संघटनेचे उपाध्यक्ष व ग्रामसेवक राजेश गव्हाणे,अधिकारी-कर्मचारी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक व ग्रामसेविका आदिंची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...