आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथे दत्तयात्रेच्या निमित्ताने भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सोमवारी मोठ्या प्रमाणावर भाविक यात्रेत आल्याने मागील आठ दिवसापासून ग्राहकाच्या प्रतीक्षेत असलेल्या व्यापाऱ्यांनी आनंद व्यक्त केला.
टेंभुर्णीतील दत्त यात्रा परिसरात प्रसिद्ध असून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर भाविक या ठिकाणी येतात. यात्रा वाढीस लागण्यासाठी यावर्षी कबड्डी व कुस्ती स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले होते. दरम्यान शेती कामात व्यस्त असलेल्या शेतकऱ्यांनी यात्रेकडे पाठ फिरवली होती. यावेळी व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. दरम्यान, सोमवारच्या आठवडी बाजारानंतर यात्रेतील चित्र पालटले गावातील ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती यामुळे व्यापाऱ्यांचा मोठा व्यवसाय झाला. हॉटेल, भांडे विक्रेते, विविध प्रकारचे खेळण्यांची विक्री झाली.
दरम्यान ग्राहक अभावी आठ दिवसापूर्वी काही हॉटेल चालक यात्रेतून निघून गेले होते. या हॉटेल चालकांना ग्राम संसद कार्यालयाच्या वतीने जाण्या-येण्याचे भाडे देण्यात आले. परंतु व्यवसाय नसल्याने हॉटेलचा चालक परतीच्या मार्गावर गेले. दरम्यान यात्रा वाढीसाठी विविध प्रकारच्या उपयोजना करून ग्राहकनाकर्षित करण्यासाठी ग्राम संसद कार्यालय प्रयत्नशिल असल्याचे सरपंच गौतम म्हस्के यांनी सांगितले. कबड्डी व कुस्ती स्पर्धेलाही चांगला प्रतिसाद मिळाला. भाविकांनी यात्रेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन दत्त संस्थांचे अध्यक्ष देवराव देशमुख यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.