आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्धार:धाकलगावात प्रलंबित असलेला पाणंद रस्ता स्वखर्चातून करण्याचा मांगदरे यांचा निर्धार

वडीगोद्री7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबड तालुक्यातील धाकलगाव येथील कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला चार किलोमीटर पाणंद रस्ता स्वखर्चातून शिवसेना कार्यकर्ते अविनाश मांगदरे यांनी तयार करण्याचा निर्णय घेतला असून महंत पुरी बाबा यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी बाळासाहेब गावडे, विष्णू नाझरकर, प्रभू बाम्हणे, सतीश ढोणे, भीमराव गाढे, अनिल घिगे, शिवाजी नाझरकर, राजू ढोणे, नामदेव शेंडगे, शिवाजी नावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

धाकलगाव येथील शेतकऱ्यांना शेतीला जाणाऱ्या या शिवरस्ताची अवस्था अत्यंत खराब झाली होती. येथील बहुसंख्य शेतकऱ्यांना या रस्त्याने जावे लागत असे. औरंगाबाद रोडवरून धाकलगाव गावास जोडणाऱ्या या शिवरस्त्याची दुरवस्था झाल्याने शेतकऱ्यांना चार किलोमीटर अंतरावर जाण्यासाठी दुसऱ्या पर्यायी मार्गाने शेतकऱ्यांना हेलपाटे मारत जावे लागत असे. त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाळ्यात या रस्त्याने शेतात जाणे फार जिकिरीचे होत होते.

धाकलगाव येथील शेतकऱ्यांनी अविनाश मांगदरे यांना हा शिवरस्ता करुन द्यावा अशी मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत अविनाश मांगदरे यांनी तात्काळ या रस्ते कामासाठी स्वखर्चाने जेसिबी मशीन उपलब्ध करून दिले. त्यामूळे हा रस्ता होत असल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी सहमती देत निर्विवादपणे हे काम सुरू केले आहे. दोन पिढ्यानंतर होत असलेल्या रस्ता कामामुळे समाधान व्यक्त होत आहे. याप्रसंगी राजू काळे, नाना तळेकर, महादेव शेंडगे, भागवत हुंबे, गुलाबभाई पठाण, जम्मू शेठ, दिलीप लगड, प्रभू आम्ले, आत्माराम शेवाळे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...