आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खवय्येगिरी:टेंभुर्णी बाजरात विविध जातींचे आंबे दाखल; घरोघरी आमरसाची मेजवानी सुरू

टेंभुर्णी23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील आठवडी बाजारात मोठ्या प्रमाणावर आंबा उपलब्ध होत असल्याने खवय्यांना विविध जातींचे आंबे खावयास मिळत आहे. गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक या राज्यांतील विविध जातीचे आंबे ग्रामीण भागात मुबलक प्रमाणात मिळत आहेत. गावरान आंबे अल्प प्रमाणात असून उशिरा पाडाला लागल्याने गावरान आंबे मिळत नाहीत.

तरीही गुजरात कर्नाटक राज्यातून येणारे केशर, बदाम, लंगडा, पायरी, हापूस, लालबाग या विविध जातीच्या आंब्यांनी बाजारपेठ काबीज केली आहे. पन्नास रुपये किलो पासून दीडशे रुपये किलोपर्यंत आंबे विकले जात आहे. आमरसासाठी केशर आंब्याला मोठी मागणी आहे. दरम्यान परिसरात असलेल्या विविध केशर बागांमधूनही आंबा विक्रीसाठी बाजारात येत आहे. परंतु स्थानिक आंब्याचे दर जास्तीचे असल्याने यावर्षी खवय्यांनी त्याकडे पाठ फिरवली आहे यामुळे परिसरातील केशर आंबा हा शहरी भागात विकला जात आहे.

ग्रामीण भागात विविध जातीचे आंबे उपलब्ध असले तरी केशर आंब्याला मोठी मागणी असल्याचे येथील अंबा विक्रेते नासीर सिद्दिकी यांनी सांगितले. यंदा गावरान आंबा उपलब्ध नसल्याने विविध जातीचे आंबे बाजारात उपलब्ध आहेत दशेरी केशर व बादाम या आंब्यांना मोठी मागणी आहे. आपल्याकडे केशर जातीच्या आंब्याची तीनशेपेक्षा जास्तीचे झाड असून यंदा वातावरणातील बदलाने आंब्याला दोन वेळेस बहार आला आहे यामुळे आंबा पिकाचे उत्पादन पावसाळ्यातही सुरू राहणार असे चित्र आहे दरम्यान दोन टप्प्यात आंबा आल्याने खवय्यांना मुबलक आंबे उपलब्ध होत असल्याचे आंबा उत्पादक गजेंद्र खोत यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...