आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कर्म:माणसाचे जीवन क्षणभंगुर, प्रत्येकाने सत्कर्म करावे ; धर्मकीर्ती महाराज यांचा उपदेश

जालना4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माणसाचे जीवन क्षणभंगुर आहे.मिळालेल्या जीवनात सत्कर्म करावे, असा उपदेश धर्मकिर्ती महाराज परभणीकर यांनी दिला.भोकरदन तालुक्यातील बाभूळगाव अखंड हरिनाम सप्ताहात कीर्तन सेवेचे त्यांनी पुष्प गुंफले. क्षणोक्षणी हाची करावा विचार या संत तुकोबारायांच्या अभंगावर निरुपन करताना ते म्हणाले, माणसाला नरदेह एकदाच मिळालेला आहे. त्याचा सदुपयोग करावा. चांगली कर्मे करावीत. कुणालाही हानी इजा पोहचेल असे वागु नये. सर्वांशी सलोख्याने वागावे, विठोबा सर्वांचे दैवत आहे. त्याची भक्ती माणुसकी शिकविणारी आहे, असे सांगितले. यावेळी बाबुराव महाराज मूर्तडकर, नारायण लोखंडे, सचिन थिटे, अनिल भुतेकर, विवेक जाधव, राहुल साबळे, कृष्णा पाबळे, गायनाचार्य प्रकाश महाराज, काकाजी महाराज लिंगेवाडीकर, अरविंद महाराज, कौतिक महाराज, मृदंगाचार्य नितीन महाराज शिंदे यांच्यासह पंचक्रोशीतील भाविकांची उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी युवा फाउंडेशन बाभूळगाव मित्रमंडळाने परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...