आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:मंठा तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा सुरू

मंठा5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जालना यांच्या विद्यमानाने मंठा तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा येथील प्रनुसरानगर मध्ये सुरु करण्यात आल्या.

जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, क्रीडा अधिकारी रेखा परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा स्पर्धा सुरु झाल्या. दिवाळीच्या सुट्टीनंतर शाळेच्या पहिल्याच दिवशी आपल्या मातीतला खेळ कुस्ती या स्पर्धेने सुरुवात झाली. सदरील स्पर्धेमध्ये मंठा तालुकास्तरावर विजयी झालेले व जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी पात्र ठरलेले खेळाडूमध्ये १४ वर्ष मुले श्रावण पांडुरंग जनकवार, पंकज विष्णू भारस्कर, दीपक रामा चिंचाणे, यश प्रकाश हनवते, १४ वर्ष मुली वैष्णवी रामकिसन सोळंके, १७ वर्षे मुले उत्कर्ष दिलीप जाधव, अनंतराज गणेशराव बोराडे, शुभम नारायण खरात, १९ वर्षे मुले विष्णू रामकिसन सोळंके, १९ वर्षे मुली वैष्णवी विष्णू जाधव यांचा समावेश आहे. विजयी खेळाडूंना जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी मंठा तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे व गटशिक्षणाधिकारी सतीश शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

या स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मंठा तालुका क्रीडा संयोजक पंजाब वाघ काम पाहत आहेत, तर सदरील स्पर्धेसाठी पंच म्हणून प्रा. रमेश शिंदे, मनोहर विरकर, राहुल काळे, विनोद राठोड, संदीप पाटील, मनोज ठाकरे, पी. एस. पालवे, अच्युत राठोड आदींनी काम पाहिले. कुस्ती स्पर्धेसाठी क्रीडा शिक्षक आर. एस.चव्हाण, ए. बी. खंडागळे यांच्यासह आदींची मोठी उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...