आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका केंद्रावर चार कर्मचारी नियुक्त:मंठा : 31 ग्रामपंचायती,  96 मतदान केंद्रे राहणार

मंठाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतीपैकी चार ग्रामपंचायत बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत. उर्वरित ग्रामपंचायतसाठी रविवार रोजी मतदान होत आहे. यासाठी एकूण ९६ मतदान केंद्र असणार आहेत. एका मतदान केंद्रासाठी प्रत्येकी चार कर्मचारी याप्रमाणे ३८४ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत, अशी माहिती निवडणूक कक्षातून देण्यात आली.

येथील तहसील कार्यालयात शनिवारी निवडणूक कर्मचाऱ्यांना साहित्य वाटप करण्यात आले. त्यानुसार शनिवारी दुपारी सर्व कर्मचारी पोलिस बंदोबस्तासह नियोजित मतदान केंद्रावर रवाना झाले. रविवारी सकाळी मतदानाला सुरुवात होत आहे. तालुक्यात एकूण ३५ ग्रामपंचायतीपैकी गुळखंड, आंधवाडी,कोकरंबा आणि रानमळा येथील निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. उर्वरित ग्रामपंचायतसाठी होणाऱ्या मतदानासाठी ३८४ कर्मचारी, १० झोनल ऑफिसर आणि ११ निवडणूक निर्णय अधिकारी असे एकूण ४०५ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

निवडणुकीसाठी १६,७११ पुरुष तर १४,९६४ महिला मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तालुक्यातील तळणी, उस्वद, उमरखेडा, हेलस, केंधळे पोखरी, कर्नावळ, बरबडा, ठेंगे वडगाव आदी ग्रामपंचायतमध्ये चुरसीची लढत पाहायला मिळत आहे. पोलिस निरीक्षक संजय देशमुख, पोलिस उपनिरीक्षक आस्मान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतदानासाठी पोलिस निरीक्षक, सहा पोलिस उपनिरीक्षक, ७० पोलिस कर्मचारी, ४६ गृहरक्षक दल कर्मचारी, राज्य राखीव दलाची अर्धी तुकडी तैनात करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाचे प्राधिकृत अधिकारी कैलासचंद्र वाघमारे,नायब तहसीलदार संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक कक्ष कर्मचारी म्हणून संदीप उगले, श्रीनिवास जोशी, सुरज जाधव, संतोष चव्हाण, डी. बी. पंजरकर आदी कार्यरत आहेत.

बातम्या आणखी आहेत...