आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्ण सेवा प्रभारी:आष्टी प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक पदे रिक्त ; मागील 11 महिन्यात एकाही पद भरल नाहीत

आष्टीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

परतूर तालुक्यातील आष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांसह विविध कर्मचाऱ्यांचे पद रिक्त असल्याने रुग्णांना आरोग्य सेवा मिळण्यास अडचणी येत आहेत. त्यातच येथील रुग्ण सेवा प्रभारी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर असल्याने हे आरोग्य केंद्रे असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

यावर्षीच्या गेल्या ११ महिन्यात या आरोग्य केंद्रात जवळपास चार वैद्यकीय अधिकारी व अनेक कर्मचाऱ्यांनी दोन चार महिन्यांची सेवा देत आपल्या सोयीनुसार पद सोडून दिल्याने या आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवा कोलमडलेली आहे. येथील आरोग्य केंद्रात या ११ महिन्यात कायमस्वरूपी एकाही वैद्यकीय अधिकाऱ्यांची आजपर्यंत नियुक्ती करण्यात आली नसल्याने या केंद्राचा कारभार वैद्यकीय अधिकाऱ्यां विना चालू असल्याने येथील रुग्ण सेवा ही रामभरोसे दिसून येत आहे. गावातील व परिसरातील अनेक नागरिकांना अनेकदा उपचारा विना परत जावे लागत असून या केंद्रांतर्गत येणाऱ्या उपकेंद्राची ही परिस्थिती यांपेक्षा वेगळी नाही. यामुळे जिल्हा आरोग्य विभागावर गावाच्या व परिसरातील नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

आज केंद्र शासनाकडून देशातील नागरिकांना मोफत उपचार मिळावे म्हणून आयुष्यमान योजनांद्वारे कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहे तर राज्य शासनाकडून” माता सुरक्षित तर घर सुरक्षित” या अभियान राबविण्यात येत आहे यात ग्रामीण भागातील १८ वर्षा वरिल महिला,माता, गरोदर महिलांचे आरोग्य सुरक्षित रावावे म्हणून विविध शिबिराचे आयोजन करुन तपासण्या करण्यात येत आहेत तर दुसरीकडे प्रत्यक्षात मात्र आरोग्य केंद्रात पूरेसे अधिकारी व कर्मचारी नसल्याचे विचित्र चित्र पाहायला मिळत आहे. बहूतेक सरकारी रुग्णालयामधील या अवस्थेमुळेच ग्रामीण भागातील गोरगरिब कुटुंबांना खिशाला परवडत नसतानाही खासगी रुग्णालयात खर्च करावा लागत आहे. येथील आरोग्य केंद्रावर आष्टी येथील २५००० हजार तर परिसरातील १६ गावातील ३५००० हजार असे एकूण ६०००० हजार नागरिकांच्या आरोग्य सेवेचा भार आहे.

बातम्या आणखी आहेत...