आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेळावा:भोकरदन येथे 1 जानेवारीला होणार मराठा वधू-वर परिचय मेळावा

भोकरदन4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील मराठा समाजातील वधू वर परिचय मेळावा १ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता रत्नमाला लान्समध्ये आयोजित करण्यात आला असून यासंदर्भात पदाधिकाऱ्यांची बैठक मेळाव्याचे अध्यक्ष सुनील जंजाळ यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

वधू वर परिचय मेळाव्याच्या नोंदणीसाठी इच्छुकांचा बायोडाटा नोंदणीसाठी विष्णु दसपुते यांच्याकडे संपर्क साधावा, तसेच मुला मुली बरोबर येताना मुलांच्या आई-वडिलांनी सोबत यावे आणि त्याचबरोबर केवळ आई-वडिलांनी या वधू वर परिचय मेळाव्याला येऊ नये त्यांना प्रवेश दिला जाणार नाही, ठरविण्यात आले.

यावेळी माजी नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख, निर्मला दानवे, ॲड. हर्षकुमार जाधव, जि.प.सदस्य आशा पांडे, फकीरा देशमुख, केशव जंजाळ, विष्णू गाढे, काकासाहेब साबळे, यादराव चव्हाण, अमोल चव्हाण, समाधान दौड, सुनील सरोदे, दादाराव सरोदे, राजेंद्र सोनवणे, सतीश रोकडे, प्रा.नंदकुमार गिर्हे, विनोद मिरकर, कृष्णा दळवी, दादाराव नवल, नानासाहेब वानखेडे, सुरेश तळेकर, विश्वास धसाळ, रामराव कराळे, आप्पासाहेब जाधव, बबन शिंदे, वैभव गायकवाड, विष्णू बरडे, राहुल लहाने, नामदेव पोटे, राजेंद्र जाधव, कृष्णा वाघ, त्रिंबक पाबळे, भगवान मिरकर, ग्रामसेवक राजेंद्र लोखंडे, नारायण लोखंडे, विठ्ठल गावंडे, रामराव गुजरे, विष्णू दसपुते, परमेश्वर शिंदे, दिपक जाधव, कैलास मव्हरे, विष्णुपंत जंजाळ आदींची उपस्थिती होती. बैठकीचेसूत्रसंचालन नारायण जिवरग यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...