आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साष्टपिंपळगाव : मराठा आरक्षण:राज्यभरातील समन्वयक, तहसीलदारांच्या विनंतीनुसार बेमुदत उपोषण मागे; मात्र ठिय्या सुरूच

शहागडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या आंदोलनाला दहा दिवस उलटले असून उपोषणकर्त्यांपैकी दोघांची प्रकृती खालावली होती

मराठा समाजाला शिक्षणासह सर्वच महत्त्वाच्या क्षेत्रांत आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव येथे गावकऱ्यांनी राज्यव्यापी ठिय्या आंदोलन व बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला दहा दिवस उलटले असून उपोषणकर्त्यांपैकी दोघांची प्रकृती खालावली होती. त्यांची डॉक्टरांनी तपासणी करून उपचार केले आहेत. दरम्यान, शनिवारी राज्यभरातील समन्वयक, तहसीलदारांच्या विनंतीनुसार गावकऱ्यांनी आपले बेमुदत उपोषण मागे घेतले असून या मागणीसाठी सुरू असलेले ठिय्या आंदोलन मात्र आगामी काळात सुरूच राहणार आहे.

मनोज जरांगे पाटील व ग्रामस्थांच्या पुढाकारातून राज्यव्यापी आंदोलनासह मराठा आरक्षणासाठी येथे बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलेले आहे. पहिल्या दिवशी उपोषणात सहभागी होण्यासाठी बैलगाड्या, ट्रॅक्टर, दुचाकी, सायकली आणून नागरिक या ठिय्या आंदोलनात सहभागी झाले. अनेक गावे या ठिकाणी रॅली काढून आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. यामुळे या गावाला सध्या यात्रेचे स्वरूप आले आहे. साष्टपिंपळगाव परिसरातील जवळपास ३० गावांतील महिला, पुरुष या आंदोलनासाठी आले होते. दरम्यान, अन्नपाणी सोडलेल्यांमध्ये संतोष ढवळे, बाबासाहेब वैद्य यांच्यासह मुक्ताबाई ढेपे (६८), मनोज जरांगे यांचा समावेश हाेता. राज्यभरातील समन्वयकांच्या विनंतीनुसार हे बेमुदत उपोषण आता मागे घेण्यात आले, परंतु ठिय्या आंदोलन सुरूच राहणार आहे.

बातम्या आणखी आहेत...