आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थशास्त्र:मराठी अर्थशास्त्र परिषद अध्यक्षपदी प्रोफेसर डॉ. दिलीप अर्जुने

जालना5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या अर्थविश्वातील महत्त्व पूर्ण अशा मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या अध्यक्षपदी जेईएस महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख प्रोफेसर डॉ. दिलीप अर्जुने यांची निवड करण्यात आली असून अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत डॉ. अर्जुने यांनी विजय संपादन केला. ५ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत जेईएस महाविद्यालयात परिषदेचे ४५ वे राष्ट्रीय अधिवेशन झाले. अधिवेशन समारोपप्रसंगी आजीव सभासदांच्या सर्वसाधारण सभेत आगामी सन २०२२-२३ वर्षाकरिता अध्यक्ष निवडीसाठी निवडणूक घेण्यात आली. अर्थतज्ज्ञ डॉ. एच. एम. देसरडा आणि प्रोफेसर डॉ. दिलीप अर्जुने यांनी उमेदवारी अर्ज भरले.

गुप्त पध्दतीने झालेल्या मतदान प्रक्रियेनंतर निकाल जाहीर करण्यात आला. यात प्रोफेसर डॉ. दिलीप अर्जुने यांना ३७ तर डॉ. देसरडा यांना ३० मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉ. अजय दरेकर, डॉ. शामराव कुलकर्णी, डॉ. सुभाष दगडे यांनी काम पाहिले. यावेळी माजी अध्यक्ष डॉ. आर. बी. भांडवलकर, डॉ. माहोरे,डॉ. मारोती तेगमपुरे, डॉ. सुशील सुर्यवंशी,प्राचार्य डॉ. शिवनारायण बजाज,डॉ. भारत खंदारे, डॉ. एम.जी.हिंगे,डॉ. बाबासाहेब वाघ, डॉ. लक्ष्मण म्हस्के, डॉ. संजय कांबळे, डॉ. प्रवीण चंदनशिवे,डॉ. शिवानंद मुंडे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...