आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत महोत्सव:मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन अमृत महोत्सवानिमित्त 12 विभाग केंद्रस्थानी

जालना13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्ष २०२२-२३ हे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. यानिमित्त मराठवाड्यातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व इतर सर्वसमावेशक विकास होण्याच्या दृष्टीने विविध १२ विभागांचा समावेश करून मार्गदर्शक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. १७ सप्टेंबर २०२२ ते १६ सप्टेंबर २०२३ या कालावधीत या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी पाच उपजिल्हाधिकारी नेमून त्यांना त्या-त्या विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

यात उपजिल्हाधिकारी (निवडणूक) डॉ. बाणापुरे यांच्याकडे आरोग्य व शिक्षण, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रवींद्र परळीकर यांच्यावर पाणीपुरवठा, मृद व जलसंधारण, वृक्षलागवड, वन्यजीव व वन विभाग, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) अंजली कानडे यांच्याकडे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास, कृषी, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) शर्मिष्ठा भोसलेंकडे घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, गृहनिर्माण तर उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) निऱ्हाळी यांच्यावर ऐतिहासिक वारसा स्थळे, प्रशिक्षण व मुल्यमापन आणि उर्जा विभाग देण्यात आला आहे. सदरील नोडल अधिकाऱ्यांनी त्या- त्या विभाग व कार्यालयाकडून संबंधित उपक्रमाची अंमलबजावणी करून घेत त्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांना द्यावयाचा आहे.

बातम्या आणखी आहेत...