आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:गुरुवारी आठही महावितरण कार्यालयांवर मोर्चा

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांंच्या कृषी पंपांचे तोडलेले विज कनेक्शन पुर्ववत करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे जिल्ह्यातील आठही तालुक्यातील विज मंडळाच्या कार्यालयासमोर ८ डिसेंबर गुरुवार रोजी सकाळी ११ वाजता शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए. जे. बोराडे यांनी दिली.

या वर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यानंतर पाणी साठा भरमसाठ आहे. त्यातच कापसाला पाणी देण्याचे दिवस आहेत. मात्र महावितरणने आडमुठी भुमिका घेवून शेतकर्‍यांच्या कृषी पंपाचा विज पुरवठा तोडला आहे. त्यामुळे अगोदर अतिवृष्टीने अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांंस वेठीस धरण्याचा प्रयत्न महावितरण करीत आहे.

यापुर्वी शिवसेनेच्या वतीने महावितरणचे अधिक्षक अभियंता यांची २४ नोव्हेंबर रोजी भेट घेवून त्यांना महावितरणच्या विविध समस्या निदर्शनास आणून देत कोणत्याही कारणास्तव शेतकऱ्यांंचे विज पुरवठा खंडीत करु नये अशी विनंती केली होती. त्याच बरोबर २८ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी यांनाही निवेदनाव्दारे शेतकऱ्यांंच्या कृषी पंपाचा विज पुरवठा खंडीत करण्यात येवूनये असे आदेश महावितरणला द्यावेत, अशी विनंती केली होती. तरीही महावितरणने जिल्ह्यात शेती पंपांचा विज पुरवठा तोडण्याचा सपाटाच लावला आहे.

या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने ८ डिसेंबर गुरुवार रोजी प्रत्येक तालुक्यातील वीज मंडळाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबकेर यांनी सांगितले.

या धरणे आंदोलनात शेतकऱ्यांंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना उपनेते लक्ष्मणराव वडले, सहसंपर्कप्रमुख शिवाजीराव चोथे, डॉ. हिकमत उढाण, जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, ए.जे.बोराडे, माजी आमदार संतोष सांबरे, जिल्हा संघटक भानुदास घुगे, उपजिल्हाप्रमुख रमेश गव्हाड, मुरलीधर शेजुळ, माधवराव कदम, युवासेनेचे जिल्हा युवाधिकारी शिवाजी शेजुळ, गणेश काळे, उपजिल्हाप्रमुख भगवानराव कदम, रावसाहेब राऊत, बाबुराव पवार, मनिष श्रीवास्वत, परमेश्वर जगताप, हनुमान धांडे, बाबासाहेब तेलगड, अशोकराव आघाव, तालुकाप्रमुख हरिहर शिंदे, हरीभाऊ शिंदे, जयप्रकाश चव्हाण, नवनाथ दौड, माधवराव हिवाळे, कुंडलिक मुठ्ठे, अशोक बरडे, उध्दव मरकड, प्रकाश सोळुंके, अजय अवचार, शहरप्रमुख बाला परदेशी, घनश्याम खाकीवाले, दुर्गेश काठोठीवाले, संघटक दीपक रननवरे युवासेनेचे शहरप्रमुख अंकुश पाचफुले, महेश पुरोहित यांच्यासह शिवसेनेच्या सर्व अंगीकृत संघटनांचे सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

दरम्यान, आठही महावितरणच्या कार्यालयावर होत असलेल्या आंदोलनात संबधीत परिसरातील शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे अवाहन शिवसेना शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने अवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...