आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गांजा जप्त:उम्रदला कपाशीच्या शेतात 23 लाखांचा गांजा जप्त

जालना9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना जालन्यातील वंजार उम्रद येथील एका शेतकऱ्याच्या कपाशीच्या शेतातून तालुका पोलिसांनी तब्बल २३ लाख रुपयांचा ११५ किलो गांजा जप्त केला आहे. तालुका जालना पोलिसांनी रविवारी सकाळी ही कारवाई केली आहे. सयाजी पालवे असे गांजा लागवड करणार्‍या शेतकर्‍याचे नाव आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ.अक्षय शिंदे, उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका ठाण्याचे पोलिस निरीक्षक रमेश जायभाये, सहायक पोलिस निरीक्षक संभाजी वडते, कृष्णा भडांगे, अरुण मुंडे, वसंत धस, विलास आटोळे, संदीप उगले, गणेश नाईकवाडे, नागरे यांच्या पथकाने केली.

बातम्या आणखी आहेत...