आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीचा विवाह:अल्पवयीन मुलीचे लग्न;‎ एक पोलिसांच्या ताब्यात‎

जालना‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरातून रुसून गेलेली अल्पवयीन मुलगी एका‎ जणाच्या घरी गेली होती. त्या घरच्यांनी त्या‎ मुलीला काही दिवस घरी ठेवून नंतर त्या‎ कुटुंबियांनी त्या मुलीचा विवाह नाव्हा रोडवरील‎ एका मठात लावून घेतल्याचा प्रकार उघडकीस‎ आला आहे. दरम्यान, या प्रकरणात रोहनवाडी‎ येथील एका मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले‎ आहे.‎ मुलीचे लग्न लावून घेतल्यानंतर मुलीला‎ जालना तालुक्यातील नंदापूर येथील शेतात ठेवले‎ होते, असे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, या‎ प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली‎ आहे. दरम्यान, या प्रकरणात मुलीला एकाच्या घरी‎ नेऊन घालण्यासाठी मदत करणाऱ्या रोहनवाडी‎ येथील एकाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात‎ घेतले आहे. मुलगी अल्पवयीन असतानाही लग्न‎ लावणारे भटजी, उपस्थित मान्यवर यांनाही पोलिस‎ चौकशीसाठी ताब्यात घेणार आहेत. या प्रकरणाचा‎ अधिक तपास पथक प्रमुख ए. एस. पाटील, चौरे,‎ डोईफोडे, प्रेमानंद लालझरे आदी करीत आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...