आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्न रोखलेली मुलगी 19 वर्षांची:अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी वर-वधू एसपींच्या दालनात, बालविवाह समजून बदनामी केल्याची तक्रार

जालना10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची नवरदेव-नवरी, आईवडील, नातेवाइकांची मागणी - Divya Marathi
संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची नवरदेव-नवरी, आईवडील, नातेवाइकांची मागणी

१०९८ या हेल्पलाइनवर आलेल्या माहितीनुसार चाइल्डलाइन, बालकल्याण समिती व स्थानिक पोलिसांनी गावात जाऊन हा विवाह रोखला. परंतु मुलीचे वय १९ असतानाही अधिकाऱ्यांच्या त्रासामुळे नातेवाइकांत बदनामी झाली, असे म्हणत वर-वधूसह नातेवाइकांनी अपर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख यांची भेट घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

घनसावंगी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली येथे ४ मे रोजी विवाह होत होता. परंतु कोणीतरी हेल्पलाइनवर मुलगी सतरा वर्षांची असल्याची माहिती दिली. यावरून चाइल्ड लाइन, बालकल्याण समिती व काही पोलिस गावात दाखल झाले. दरम्यान, गावात आलेल्या पथकाला मुलीचे वय १९ तर मुलाचे वय २७ असल्याचे पुरावे दाखविण्यात आले. परंतु यानंतरही दुसऱ्या दिवशी प्रसिद्धी माध्यमांमध्ये या गावात बालविवाह रोखला अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वधू-वराससह त्यांच्या नातेवाइकांनी अपर पोलिस अधीक्षकांकडे केली आहे. यावेळी वधूच्या नातेवाइकांनी मुलीच्या वयाचे अधिकृत पुरावे दाखवूनही दामिनी पथकासह, चाइल्ड लाइनच्या अधिकाऱ्यांनी लग्न सोहळ्यात अडथळे आणून कुटुंबीयांची बदनामी केल्याचा आरोप नातवाइकांनी केला आहे. बालविवाह झालेला नसताना अज्ञाताच्या तक्रारीवरून बालविवाह समजून बेजबाबदारपणे लग्नात बाधा आणून बदनामी केल्याप्रकरणी अपर पोलिस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले. याप्रकरणी विश्वनाथ बिडवे यांनी पोलिस अधीक्षकांना गुरुवारी निवेदन दिले. तक्रारदार यांची नात दुर्गा परसराम बिडवे आणि नितीन नाथा लांडगे यांचा बुधवारी रोजी घनसावंगी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली येथे दुपारी २ वाजता विवाह आयोजित केला होता. मात्र हा विवाह सोहळा ४ वाजता पार पडला आहे.

प्रकरणाची माहिती तपासतोय : इंगळे
या प्रकरणात कुणाची चुकी आहे, कागदपत्रे तपासली का, कुणाकडून चुकी झाली आहे, याबाबत माहिती घेत आहे, असे बालकल्याण समितीचे बाल संरक्षण अधिकारी गजानन इंगळे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...