आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा दिवस भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल:आजपासून मार्तंड भैरव षड‌्रात्रोत्सवास प्रारंभ

अंबड7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील श्री खंडोबा व बिलकेश्वर संस्थानात २४ ते २९ डिसेंबर दरम्यान मार्तंड भैरव षडरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे.मंदीरात दररोज सकाळी मल्हारी महात्म पाठाचे वाचन हनुमंत काळबांडे, बाळासाहेब नामले हे करणार आहेत. तसेच सकाळी सहा वाजता श्रीराम भक्ती फेरीचा भजनाचा कार्यक्रम होईल. तसेच दररोज दुपारी स्वामी मठ महिला मंडळ, गणपती गल्ली महिला मंडळ, राममंदीर महिला मंडळ, माहेश्वरी महिला मंडळ, होळकर गल्ली महिला मंडळाचे भजन होणार आहे.

गुरुवारी सकाळी सात वाजता श्री ची घटस्थापना केली जाणार आहे. २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता सखाराम महाराज अवतार मेहेर बाबा भजनाचा कार्यक्रम, २६ नोव्हेंबर रोजी शशांक काळबांडे यांचे नारदीय कीर्तन होणार आहे. २७ रोजी राहुलबुवा तळेगावकर यांचे नारदीय कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.

२८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता नाग दिपोत्सव आिण दीप प्रज्वलन नायब तहसीलदार धर्माधिकारी यांच्याहस्ते केले जाणार आहे. यावेळी अथर्व दिनकर सबनीस यांचे नारदीय कीर्तन, उध्दव महाराज घुगे, वाघलखेडा भजनी मंडळाचा कार्यक्रम होईल. २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता तळी भंडारा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. शहर आणि परिसरातील धार्मिक कार्यक्रम आणि दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन खंडोबा व बिलकेश्वर संस्थानच्यावतीने करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...