आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादविवाद स्पर्धा:हुतात्मा जनार्दन मामा नागापूरकर वादविवाद स्पर्धा

जालना21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना तालुक्यातील तालुकास्तरीय हुतात्मा जनार्दन मामा नागापूरकर वादविवाद स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत 💧पहिला गट ६ ते ८ मध्ये २० तर दुसऱ्या गटात ९ ते १२ असे ८ वादी- प्रतिवादी संघ सहभागी झाले. या स्पर्धेत पहिल्या गटात लोकमान्य विद्यालय, जालना तर दुसऱ्या गटात जिजामाता विद्यालय भाटेपुरी हे विजेते ठरले.

या स्पर्धेसाठी जेष्ठ अधिव्याख्याता डायटचे डॉ. संजयजी येवते, अधिव्याख्याता डाएट योगेश्वर जाधव, मधुकरजी जोशी, जालना गटशिक्षणाधिकारी गीता नाकडे, मुख्याध्यापक प्रकाश कुंडलकर, जेईएसचे प्रा. सोनवणे, प्रा. ढोबळे मत्स्योदरी अध्यापक महाविद्यालय जालना, शिक्षण विस्तार अधिकारी लोंढे यांच्या हुतात्मा जनार्दन मामा नागापूरकर यांच्या प्रतिमा पूजनाने वादविवाद स्पर्धेस सुरुवात झाली. या कार्यक्रमास उपस्थित सर्व सन्माननीय व्यक्तीं, परीक्षकांचे गट शिक्षणाधिकारी गीता नाकाडे व मुख्याध्यापक प्रकाश कुंडलकर यांनी स्वागत केले. हुतात्मा जनार्दन मामा नागापूरकर वादविवाद स्पर्धेचे प्रास्ताविक श्रीमती गीता नाकाडे गट शिक्षणाधिकारी गट साधन केंद्र जालना यांनी केले.

या वादविवाद स्पर्धेचे परीक्षक म्हणून पहिल्या गटासाठी डॉ. संजयजी येवते, योगेश्वर जाधव, डॉ. करुणा हिवाळे तर दुसऱ्या गटासाठी मधुकर जोशी, प्रा.ढोबळे , प्रा. सोनवणे यांनी काम पाहिले. 💧 या स्पर्धेसाठी सर्व केंद्र प्रमुख सातपुते, भिसे, भालेराव, राजगिरे, जाधव, विषय साधन व्यक्ती छगन जाधव, संतराम गायकवाड, रवींद्र कदम, करुणा हिवाळे, शीतल मिसाळ, मनिषा गायकवाड,💧 विशेष शिक्षक शाम भांदरगे, सिद्दीकी, नसीर शेख, स्वामी मॅडम आदींची उपस्थिती होती.💧 या संपूर्ण स्पर्धेचे सूत्रसंचालन श्रीमती लोंढे (शिक्षण विस्तार अधिकारी गट साधन केंद्र जालना) तर कार्यक्रमाचे आभार प्रकाश कुंडलकर यांनी केले.

पहिल्या गटातील विजेते संघ असे : तालुकास्तरीय प्रथम : लोकमान्य विद्यालय, जालना जालना द्वितीय : संस्कार प्रबोधिनी विद्यालय, जालना जालना, तृतीय : केंद्रीय प्राथमिक शाळा पिरकल्याण, प्रोत्साहन पर पारितोषिक प्रथम : प्रा. शा. शांतिनिकेतन विद्या मंदिर, जालना द्वितीय : जिल्हा परिषद प्राथमिक प्रा. शा. भिलपुरी या शाळांनी बाजी मारली.

बातम्या आणखी आहेत...