आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालन्यात स्टील कंपनीत भीषण स्फोट:औद्योगिक वसाहत हादरली, बेचिराख झाली भट्टी; 6 कामगार जखमी, दोघे गंभीर

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जालना येथील औद्योगिक वसाहतीतील गीताई स्टील कंपनीत भट्टीचा आज भीषण स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की भट्टीचे अक्षरशः तुकडे झाले आहेत.

दुर्घटनेत 6 कामगार जखमी झाले आहे. तर, दोन जण गंभीर आहेत. जखमींना औरंगाबाद शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली.

स्फोटानंतर स्टील कंपनीतील दृश्य
स्फोटानंतर स्टील कंपनीतील दृश्य

यापूर्वीही अनेकदा स्फोट

जालना औद्योगिक वसाहतीतील स्टील कंपन्यांमध्ये कामगारांच्या सुरक्षेची कुठलीही काळजी घेतली जात नसल्याने काही दिवसांपासून अनेक भीषण स्फोट घडत आहेत. यात अनेक कामगार मृत्युमुखी पडले आहेत. काहींना तर कायमचे अपंगत्व आले आहे.

घटनास्थळी पोलिस दाखल

दरम्यान, आज स्फोट झाल्यानंतर घटनास्थळी पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, पोलिस उपअधीक्षक निरज राजगुरु, पोलिस निरीक्षक रघुनाथ नाचण यांनी भेट दिली आहे. स्फोट नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. पोलिस पुढील घटनेचा तपास करत आहेत.

जालना औद्योगिक वसाहतीतच ही घटना घडल्याने कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
जालना औद्योगिक वसाहतीतच ही घटना घडल्याने कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

दोषींवर कारवाईची मागणी

आजच्या स्फोटामुळे जालना औद्योगिक वसाहतीतील कामगार व कामगारांचे नातेवाईक संतप्त झाले आहेत. पोलिस प्रशासनाने आता संबंधित स्टील कंपनीचे मालक व अधिकारी यांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आता कामगार व त्यांच्या नातेवाईकांनी केली आहे.

कामगारांचा हकनाक बळी

दरम्यान, या घटनेमुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जालन्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी याप्रकरणी कामगारांच्या सुरक्षेत हलगर्जी करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. या घटनेनंतर समाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले की, यापूर्वीही अनेकदा कंपन्यांवर कारवाईची मागणी केली आहे. मात्र प्रत्येक वेळी कारवाईकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे मात्र कामगारांचा हकनाक बळी जात आहे. कारवाई न करुन प्रशासन आणखी किती कामगारांचा बळी घेणार, असा संतप्त सवालही कार्यकर्त्यांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...