आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य:जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वाढदिवसानिमित्त दिले साहित्य

जालना3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाढदिवस म्हटलं की, मोठा केक, हार, पार्टी असे वातावरण असतांना गरीब विद्यार्थ्यांना स्वतःच्या वाढदिवसा निमित्त शैक्षणिक साहित्य, खाऊ वाटप करून वाढदिवस साजरा करणारे दावलवाडी येथील शिक्षणप्रेमी गणेश कदम यांनी बदनापूर तालुक्यातील नुतन वसाहत सेलगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वर्कबुक व खाऊ वाटप करून वाढदिवस साजरा केला.

अशा स्तुत्य उपक्रमाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक संजय हेरकर, शालेय समिती अध्यक्ष दाविद घोरपडे, नवनाथ पालोदकर, गणेश शिंदे, बळीराम शिंदे, किरण वाळके, संदिप जाधव, रंजित सावंत, भगवान डोंगरे यांनी गणेश कदम यांचे अभिनंदन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...