आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मत्स्योदरी:11 हजार दिव्यांनी लखलखला मत्स्योदरी देवीचा परिसर

अंबड5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबड शहराचे आराध्यदैवत श्री मत्स्योदरी देवी मंदिरावर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव साजरा करण्यात आला. मत्स्योदरी दीपोत्सव मंडळ १८ वर्षांपासून हा उत्सव राबवत आहे. सोमवारी ११ हजार दिव्यांनी मंदिर परिसर उजळून निघाला. यात २२ हजार वाती वापरण्यात आल्या.

तसेच १८ लिटर तेल वापरण्यात आले. सर्वांच्या सहभागामुळे हा दीपोत्सव न राहता लोकोत्सव झाला आहे. या वेळी वैष्णवी राक्षसभुवनकर, पूजा देशमुख यांनी मत्स्योदरी देवीच्या रांगोळीचे रेखाटन केले. छाया : महेश कुलकर्णी

बातम्या आणखी आहेत...