आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुस्त्याचा आखाडा:मौजपुरीत रंगला कुस्त्याचा आखाडा; मल्लांनी जिंकली 55 हजारांची बक्षिसे, गुढी पाडवा आणि मराठी नवीन वर्षाच्या निमित्ताने भव्य कुस्त्यांचा आखाडा

जालना4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना तालुक्यातील मौजुपरी गावात प्रतीवर्षाप्रमाणे या वर्षी देखील गुढी पाडवा आणि मराठी नवीन वर्षाच्या निमित्ताने भव्य कुस्त्यांचा आखाडा रंगला होता. यावेळी सुमारे ७० मल्लांनी ५५ हजार रुपयाची बक्षिसं जिंकली.

मौजुपरी येथील श्री. रामेश्वर संस्थान हे तिर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. पंचक्रोशीत या संस्थानचे महत्व असल्याने लोखो भावीक दर्शनासाठी रामेश्वर मंदीरात येतात. महाशिवरात्री आणि गुढी पाडव्याला या मंदीर परिसरात मोठ्या प्रमाण भावीकांची गर्दी होत असते. गुढी पाडव्याच्या निमित्ताने मंदिरात भावीक कावड खेळतात तर अनेकांनी कबुल केलेले नवसं फेडण्यासाठी बारा गाड्या ओढतात. पाडव्याच्या दिसव आधी काठी बसवून तिची मनोभावे सेवा केली जाते. ही परंपरा गेल्या अनेक वर्षापासून चालत आलेली आहे. सायंकाळच्या वेळी मंदिर परीसरात रेवड्या उधळून आणि अंबील वाटून भक्तीची सेवा केली जाते. पाडव्याच्या दुसर्‍या दिवसी मौजपुरीत कुस्त्यांचा सामना रंगत असतो. या वर्षी देखील मौजुपरी येथे सुमारे ७० मल्लांनी कुस्तीमध्ये सहभाग नोंदविला. कमीत कमी १०० रुपयापासून ते ११ हजार रुपयापर्यंत कुस्तीचे बक्षिसं ठेवण्यात आली. गावात कुस्तीसाठी आलेल्या मल्लांना जाण्यायेण्यासाठी २०० रुपये तर कुस्ती जिकंणाऱ्या मल्लांना बक्षिसं देण्यात आली. या वर्षी कुस्तीच्या यशस्वी नियोजनासाठी सरपंच भागवत राऊत, उप सरपंच आप्पासाहेब डोंगरे, बद्रीनारायण भसांडे, सत्यनारायण ढोकळे, राम जाधव, नारायण गायकवाड, विष्णू डोंगरे, बंडू काळे, बालाजी बळप, बंडू डोंगरे, अच्युत मोरे, निवृती जाधव, बळीराम गायकवाड, कृष्णा हिवाळे, माऊली ढोकळे, ज्ञानेश्वर ढोकळे, बबन डोंगरे, दत्ता काकडे, हरी काळे, दिपक डोंगरे, रामेश्वर महाडीक, बबन शामगीर, नारायण शामगीर, अरुण डोंगरे, अंकुश काळे, रामेश्वर गावकवाड, गजानन गायकवाड, आबासाहेब डोंगरे आदींनी परिश्रम घेतले.

वैष्णवी साळुंके हिनेही गाजवला आखाडा
मौजपुरी येथे रंगलेल्या आखाड्यात वैष्णवी या मुलीने प्रवेश केला अन कुस्ती खेळण्यासाठी आखाड्यात फेरी मारली. यावेळी निरखेडा येथील एका मुलाने कुस्तीसाठी हात दिला. यावेळी दोघांनीही १ हजार रुपयावर कुस्तीचा सामना सुरु केला. मुलीने कुस्तीसाठी घेतलेला पुढाकार हा सर्वांसाठी कौतुकाचा विषय बनला होता. तब्बल १० ते १५ मिनीटं सुरु असलेल्या कुस्तीत कोण बाजी मारणार याकडे सर्व आखाडा प्रेमींचे लक्ष लागले होते. परंतु अचानाक डाव मारुन वैष्णवी साळुंकेने प्रतिस्पर्धकाला चितपट करुन १ हजार रुपयाचे बक्षिस जिंकले.

बातम्या आणखी आहेत...