आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराया जगामध्ये जो आला त्याला एक दिवस परत अल्लाह कडे (ईश्वराकडे) जायचे आहे.आसमंतात (परलोकात)एक जग आहे.तेथील आयुष्याचा अंत नाही. तेथील आयुष्याचे निर्णय हे आपल्या जगातील केलेल्या कर्मावर अवलंबून असते. त्यामुळे प्रत्येक मनुष्याला आपल्या या आयुष्यात काही तरी चांगले कार्य, कर्म करायला हवे कारणं त्यांचे परलोकातील आयुष्य साध्य होईल. असे प्रतिपादन दिल्ली मरकज चे मौलाना युसुफ साद साहाब यांनी केले.
परतूर तालुक्यातील आष्टी येथे जिल्हा स्तरीय दोन दिवसीय तबलिगी इज्तेमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिल्ली मरकज येथून आलेले मौलाना युसुफ साद साहाब बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मौलाना इलियास साद साहाब, मुफ्ती फुरखांन, मौलाना याकुब, मोहम्मद फारुखसाब,नाजिम खारी वसिम साब,खारी शमशोद्दीन,गावचे अमिर अब्दुल रहेमान साब उपस्थित होते.मौलाना युसुफ साद पुढे बोलताना म्हणाले की प्रेषित महंमद पैगंबर यांच्या आचारविचारावर चालण्याची आवश्यकता आहे.
आपले या जगातील मनुष्य हे तात्पुरते आहे यामुळे आसमंतातील (परलोकातील) आयुष्य साध्य करण्यासाठी अल्लाहाने कुराणाच्या माध्यमातून स्पष्ट शब्दात सांगितले आहे की आपले आयुष्य हे सर्वांच्या भल्यासाठी असावे, तुमच्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही आपली गरज भागवून जर पैसे शिल्लक असतील तर ते गरजूंवर खर्च करावे,आई वडील आणि वडिलधारी लोकांचा आदर करावा , आपल्या पाऊलखुणावर अवदया समाज चालावा असे आचरण हवे असे उपस्थित लाखों भक्तांना प्रबोधन केले.
जगाच्या सुख शांतीसाठी प्रार्थना : जिल्हा स्तरीय दोन दिवसीय तबलीकी इज्तेमातील लाखों समाजबांधवांना विविध धर्मगुरू च्या माध्यमांतून मार्गदर्शन करण्यात आले व शेवटी मौलाना युसुफ साद साहाब यांनी जगात सुख शांतीसाठी विशेष प्रार्थना केली. यासाठी जिल्हाभरातून आलेल्या समाज बांधवांसह धर्मगुरूंची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.