आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरात्र उत्सव:नवरात्रातील भाविकांच्या आरोग्यसेवेसाठी औषधी

अंबड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवरात्र उत्सवानिमित्त मत्स्योदरी देवी मंदिरात येणाऱ्या भाविकांना आरोग्यसेवा देण्यासाठी रिटेल अँड होलसेल केमिस्ट असोसिएशन तर्फे औषधीचा पुरवठा करण्यात आला. शासकीय उपजिल्हा रुग्णालय अंबड येथील डॉक्टर व कर्मचारी भाविकांच्या आरोग्याची सेवा देण्यासाठी नवरात्र उत्सवात कार्यरत असतात.

होलसेल केमिस्ट असोसिएशन तर्फे रुग्णांना लागणारी औषधी मागील वीस वर्षापासून परवठा करत असून या वर्षीच्या औषधी पुरवठा शासकीय रुग्णालयाच्या डॉक्टरांकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी जालना जिल्हा सहाय्यक पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख , उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्ता देगावकर, प्रभाकर पवार, केमिस्ट असोसिएशन संघटनेचे जिल्हाध्यक्ष साईनाथ पवार, सुनील शेळके, जितेंद्र लखोटिया, दिलीप जायभाये, अनंत वरीयानी, तुकाराम डोंगरे, शिवाजी बजाज आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...