आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात भेटीगाठी ; पांगारकरांच्या वतीने झाले दिवाळी स्नेहमिलन

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा नगरसेवक आशोक आण्णा पांगारकर, नगरसेवक विजय पांगारकर व मित्र परिवाराच्या वतीने ३० ऑक्टोबर रविवार रोजी दीपावली स्नेह मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्नेह मिलन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी माजी आमदार अरविंदराव चव्हाण, डॉ. संजय राख, भास्करराव आंबेकर, ब्रम्हानंद चव्हाण, राजेंद्रजी राख, पंडित भुतेकर, अभिमन्यू खोतकर, भाऊसाहेब घुगे, मनोहर सिंगारे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे, भाजपा शहराध्यक्ष राजेश राऊत, रामेश्वर भांदरगे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

दरवर्षी हा स्नेह मिलन कार्यक्रम भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा नगरसेवक आशोक आण्णा पांगारकर, नगरसेवक विजय पांगारकर व मित्र परिवाराच्या वतीने घेतला जातो. यावेळी मुक्तेश्वर लॉन्स परिसरात साजरा झाला. या प्रसंगी परिसरातील नागरिकांनी एकत्रित येऊन एकमेकांशी संवाद साधून दिवाळी नूतन वर्षाच्या शुभेच्छा देऊन अतिशय उत्साहाच्या वातावरणात स्नेह मिलन संपन्न झाले. या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह सगीर अहमद, शेख महेमूद, विनायक फुलंब्रीकर, संजय इंगळे, महेंद्र रत्नपारखे, डॉ. वरकड, राजेश ओ. राऊत, डॉ. बळीराम बागल, बद्रीनाथ पठाडे, देविदास देशमुख, भागवत बावणे, संजय देठे, राजेश बाबरेकर, संजय आटोळे, शिवराज जाधव, बाबासाहेब कोलते, संजय डोंगरे, लोहियाजी, अमन सुभाष देविदान, वीरेंद्रजी धोका, दिनकर घेवंदे, किशोर मघाडे, दत्ता जाधव, मधुकर घेवंदे, स्वप्नील गायकवाड, अमन मित्तल, गणेशजी राऊत, सुनील राठी, संजय मुथा, सतीश पंच, राजेंद्र वाघमारे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...