आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजालना सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील गावात विभाग, गटनिहाय शेतकरी ऊस उत्पादक बागायतदार कामगार यांच्या जनजागृती बैठका घेतल्या जाणार आहेत. आमदार कैलास गोरंट्याल यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारपासून या बैठका होतील, अशी माहिती जनजागृती बैठकांचे मुख्य संयोजक डॉ. संजय लाखे पाटील यांनी दिली. या बैठकीमध्ये कारखान्याचे माजी चेअरमन रामप्रसाद कुलवंत, ज्येष्ठ नेते ज्ञानेश्वर भांदरगे, अंकुशराव राऊत, डी. के. मोरे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
जालना सहकारी साखर कारखान्याची चुकीच्या पद्धतीने व बेकायदेशीररीत्या झालेली विक्री, खाजगी कंपन्यांची अदलाबदली, गेल्या १२ वर्षापासून खरेदीदार खाजगी कंपनीने कारखाना चालू न केल्यामुळे झालेली कारखाना संपत्ती, मशिनरीची वाताहत, बेकायदा विल्हेवाट, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आणि कामगार, मजूर तसेच कारखाना कार्यक्षेत्रातील कारागीर, छोटे व्यावसायिक यांचे न भरून येणारे नुकसान यावर या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे.
उपस्थितचे केले आवाहन
पहिल्या टप्प्यात म्हणजे शुक्रवार सकाळी १० वाजता देवी मंदीर, वाघरुळ, दुपारी १ वाजता वटेश्वर मंदीर, नेर, दुपारी ४ वाजता रामनगर, सायंकाळी ६ वाजता गोलापांगरी येथे या बैठका होतील. यावेळी आजी- माजी पदाधिकारी, संचालक शेतकरी, कामगार बांधवांनी या बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्य संयोजक डॉ. संजय लाखे पाटील, ॲड. सोपानराव भांदरगे, सुभाष कोळकर, सुरेशराव खडके, माऊली कदम, ज्ञानेश्वर डुकरे, अशोकराव देशमुख, चंद्रकांत देशमुख, कमलाकरराव अंभुरे, अरुणराव वझरकर, प्रल्हादराव हेकाडे, लक्ष्मणराव राजे शिंदे, परसराम मोहिते आदींनी केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.