आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयोजन:शहरात आज मेगा विधी सेवा कॅम्पचे आयोजन

जालना4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अखिल भारतीय जनजागृती अभियान, पॅन इंडिया लिगल अॅवेअरनेस अँड आऊटरिच प्रोग्रामअंतर्गत रविवारी सकाळी १० वाजता जालना शहरातील गांधी चमन, आठवडी बाजार, नगर परिषद येथे विविध शासकीय विभागातर्फे गरजू लोकांना माहिती देण्यासाठी मेगा विधी सेवा कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. यात आरोग्यविषयक माहिती दिली जाणार असून संबंधित सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आयईसी साहित्यासह आरोग्य मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांनी दिले आहेत.

यात महात्मा फुले जनआरोग्य योजना, आरबीएसके विभाग, डीईआयसी, आरकेएसके, नेत्र विभाग, महाहिंद लॅब, आयुष, एनसीडी, एनटीसीपी, एनओएचपी, डीएमएचपी विभागाची माहिती देण्यासाठी डॉ. अविनाश मरकड, डॉ. मीनल देवळे, विद्या म्हस्के, माया सुतार, योगिता काकडे, अमोल पेरकर, गणेश मानकरी, डॉ. कुलदीप वाघपांजर, डॉ. अभिजित शिंदे, डॉ. प्रशांत कांडेकर, डॉ. संदीप गोरे, प्रदीप शिंदे, अनिकेत गिराम, शीतल शिंगारे आदींची नेमणूक करण्यात आली आहे.

विधी सेवा प्राधिकरणकडून सर्वच विभागांना सूचना
जिल्हाधिकारी, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, समाजकल्याण अधिकारी, महिला व बालविकास अधिकारी, पोलिस अधीक्षक आदी प्रमुख अधिकाऱ्यांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणकडून पत्र पाठवून आपापल्या विभागातील माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध योजनांच्या माहितीचे स्टॉल सकाळी १० वाजेपूर्वी लावण्याची व्यवस्था करावी, अशी सूचना सचिव राजेश अहिर यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...